Lokmat Agro >स्मार्ट शेती > MahaDBT Lottery List : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरणची दुसरी लाभार्थी निवड यादी आली, वाचा सविस्तर 

MahaDBT Lottery List : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरणची दुसरी लाभार्थी निवड यादी आली, वाचा सविस्तर 

Latest news MahaDBT Lottery List Second beneficiary selection list of MahaDBT agricultural mechanization scheme | MahaDBT Lottery List : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरणची दुसरी लाभार्थी निवड यादी आली, वाचा सविस्तर 

MahaDBT Lottery List : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरणची दुसरी लाभार्थी निवड यादी आली, वाचा सविस्तर 

MahaDBT Lottery List : या महाडीबीटी पोर्टल वर विविध योजना साठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जातात.

MahaDBT Lottery List : या महाडीबीटी पोर्टल वर विविध योजना साठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जातात.

शेअर :

Join us
Join usNext

MahaDBT Lottery List  : कृषी विभागामार्फत विविध यंत्रसामग्री व अवजारांचे वितरण केले जाते. महाराष्ट्र शासनाने यासाठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल सुरु केले असून, या पोर्टलद्वारे पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते. या पोर्टलवर कृषी यांत्रिकरण योजनेसाठी दुसरी सोडत यादी जाहीर झाली आहे 

या सोडत यादीमध्ये राज्यातील एकूण ४० हजारहून अधिक  शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. यानंतर शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत महाडीबीटी पोर्टलवर जाऊन कागदपत्रे अपलोड करावी लागतात. 

अशी करा प्रक्रिया 

  • कृषि यंत्र/औजारे सोडत यादी पाहण्यासाठी महाडीबीटी  पोर्टलवर जावे. 
  • या ठिकाणी शेतकरी योजना पर्यायावर क्लिक करावे. 
  • त्यानंतर खाली निधी वितरित लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करावे. 
  • या ठिकाणी आपला जिल्हा, तालुका, गाव निवडावे. 
  • यानंतर आपल्यासमोर गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी समोर येईल, आपले नाव पाहून पुढील प्रक्रिया करावी. 

अशी आहे जिल्हानिहाय शेतकरी संख्या 

यामध्ये जवळपास 44 हजार शेतकऱ्यांची निवड झाली असून अकोला जिल्ह्यातील 1536 शेतकरी, अमरावती जिल्ह्यातील १३३१ शेतकरी, अहिल्यानगर जिल्ह्यातील २६८३ शेतकरी, कोल्हापूर जिल्ह्यातील ७८३ शेतकरी, गडचिरोली जिल्ह्यातील १५० शेतकरी, गोंदिया जिल्ह्यातील ४६१ शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यातील ७७८ शेतकरी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३९४ शेतकरी, जळगाव जिल्ह्यातील २०२९ शेतकरी... 

जालना जिल्ह्यातील १७७४ शेतकरी, ठाणे जिल्ह्यातील ७ शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातील १७३८ शेतकरी, धुळे जिल्ह्यातील १२४४ शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी, नांदेड जिल्ह्यातील ३४१ शेतकरी, नागपूर जिल्ह्यातील ७५० शेतकरी, नाशिक जिल्ह्यातील १४१८ शेतकरी, परभणी जिल्ह्यातील ३०३० शेतकरी, पालघर जिल्ह्यातील २० शेतकरी, पुणे जिल्ह्यातील १५३८ शेतकरी, बीड जिल्ह्यातील २३११ शेतकरी.... 

बुलढाणा जिल्ह्यातील ३०७७  शेतकरी, भंडारा जिल्ह्यातील ३५७ शेतकरी, यवतमाळ जिल्ह्यातील १७३४ शेतकरी, रत्नागिरी जिल्ह्यातील २२ शेतकरी, रायगड जिल्ह्यातील १६ शेतकरी, लातूर जिल्ह्यातील २९८९ शेतकरी, वर्धा जिल्ह्यातील १०४६ शेतकरी, वाशिम जिल्ह्यातील ११७० शेतकरी, सांगली जिल्ह्यातील १०५९ शेतकरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९२ शेतकरी, सोलापूर जिल्ह्यातील २१३१ शेतकरी, हिंगोली जिल्ह्यातील १३१३ शेतकरी असे एकूण ४४ हजार १५१ शेतकऱ्यांची निवड झाली आहे.

Web Title: Latest news MahaDBT Lottery List Second beneficiary selection list of MahaDBT agricultural mechanization scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.