Lokmat Agro >स्मार्ट शेती > MahaDBT Lottery List : कृषी यांत्रिकीकरणची नवीन सोडत यादी आली, शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन 

MahaDBT Lottery List : कृषी यांत्रिकीकरणची नवीन सोडत यादी आली, शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन 

Latest News MahaDBT Lottery List New draw list for agricultural mechanization has come out | MahaDBT Lottery List : कृषी यांत्रिकीकरणची नवीन सोडत यादी आली, शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन 

MahaDBT Lottery List : कृषी यांत्रिकीकरणची नवीन सोडत यादी आली, शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन 

MahaDBT Lottery List : महाडीबीटी शेतकरी योजना (Mahadbt Portal) पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी काढण्यात आलेली आहे

MahaDBT Lottery List : महाडीबीटी शेतकरी योजना (Mahadbt Portal) पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी काढण्यात आलेली आहे

शेअर :

Join us
Join usNext

Mahadbt Portal :  दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी महाडीबीटी शेतकरी योजना (Mahadbt Portal) पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी काढण्यात आलेली आहे. तरी या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे. त्यांनी आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करून घ्यावयाची आहेत असे आवाहन करण्यात आले आहे. 

महाडीबीटी सोडत यादीमध्ये (MahaDBT Lottery List) लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फार्मर आयडी, सातबारा, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट तसेच ट्रॅक्टरचलित अवजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्तीचे आरसी बुक अपलोड करावे लागते. त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटी मध्ये आहेत. 

या लिंकवर जाऊन शेतकऱ्यांची यादी पाहता येईल 

ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे आणि जर ट्रॅक्टर हे निवड झालेले व्यक्तीच्या नावाने असेल तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने असणे आवश्यक आहे. यामध्ये आई, वडील आणि त्यांचे अविवाहित अपत्य यांचा समावेश आहे. 

जिल्हा निहाय निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहुयात...

बुलढाणा १४६५, सोलापूर ८६६, लातूर ८१८, अहिल्यानगर ७९६, जळगाव ६२०, सांगली ६०९, नाशिक ४५८, परभणी ४५५, जालना ३८५, सिंधुदुर्ग ३२४, धुळे ३१७, यवतमाळ ३१४, भंडारात २९०, पुणे १६९, नांदेड २६२, सातारा २३३, चंद्रपूर २२६, गोंदिया २१६, हिंगोली १५२, वर्धा १५१, धाराशिव १२७, बीड १८९, कोल्हापूर ८५, नागपूर ८४, छत्रपती संभाजी नगर ५४, पालघर ५०, रायगड ४२, ठाणे ३९, नंदुरबार ३५, अमरावती २५, वाशिम २१, अकोला १७, रत्नागिरी १२, गडचिरोली ०१ अशी शेतकऱ्यांची निवड झाली आहे.

Web Title: Latest News MahaDBT Lottery List New draw list for agricultural mechanization has come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.