Agriculture News : नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामातील (Kharif Season) मका हे महत्वाचे तृणधान्य पिक आहे. सद्यस्थितीत मका पिकाची पेरणी १९ हजार ६ हजार हेक्टर क्षेत्रावर झालेली असून मका पिकाच्या सरासरी क्षेत्राच्या ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
पेरणी झालेल्या मका पिकावर (Maize Crops) काही ठिकाणी नवीन लष्करी अळीचा (FAW) प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर किडीच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
लक्षणे :
> नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका पीक १५ दिवसापासून ते कणी अरेपर्यंत दिसून येते.
> प्रथम अवस्थेतील अळी ही कोवळ्या पानांवर आपली उपजीविका करते. एका बाजूने खरवंडून खाल्ल्यामुळे पानावर पांढरे ठिपके दिसून येतात.
> पूर्ण वाढ झालेल्या अळ्या झाडाची पूर्ण पाने खाऊन फरू पानाच्या मिराना शिल्लक ठेवतात.
> पाने अर्ध्यातून खाऊन कापून टाकते.
> अळीच्या प्रादुर्भावाने पिकाच्या गाभामध्ये ओला, पिवळा, तपकारी रसाचे खाउन शिलक राहिलेल चुरा भरून ठेवते.
प्रतिबंधात्मक उपाय :
> नवीन लष्करी अळी समूहाने अंडी घातल्याने अंडपुंज व समूहातील बारीक अळ्या हाताने वेचून नष्ट करावी,
> नवीन लष्करी अळीचे पतंगाच्या देखरेखीसाठी प्रती हेक्टरी ५ कामगंध सापळ्याचा वापर करावे.
> तसेच पतंगाच्या एकात्मिक प्रतीबंधासाठी २० सापळे स्थापित करावी.
> नवीन लष्करी अळीचे पतंग नियंत्रणासाठी प्रती हेक्टरी १ प्रकाश सापळ्याचा वापर रात्री ६ ते १० च्या दरम्यान चालू ठेवावे.
> किडीची अळी अवस्था नियंत्रणासाठी प्रती एकरी २० पक्षी धाबे उभे करा
जैविक नियंत्रणाचे उपाय :
> पेरणीच्या वेळेस निबोळी पेंड प्रती हेक्टरी २५० किलो किडीची कोश अवस्था नियंत्रणासाठी वापरावे.
> ट्रायकोग्रामा चीलोणीस या परजीवी किडीची अडी ३० हजार / प्रती एकर पीक १५ दिवसाचे झाल्यावर आठवड्यातून एकदा सोडावे
> नवीन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी बेरीया बसिना १.१५ डब्लुपी प्रती ५० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
> नवीन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी पिकाच्या सुरुवातीच्या काळात ५६ निंबोळी अर्काची फवारणी करावी.
> नवीन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी दर्शपर्णी अर्क प्रती १५० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रणाचे उपाय :
> जर नवीन लष्करी अळीची संख्या आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (१०% प्रादुर्भाव ग्रस्त झाडे/५ ते १० पतंग / प्रती सापळा/ सलग ३ रात्र) तर खालील किटकनाशकाची फवारणी करावी.
> नवीन लष्करी अळीची प्रभावी नियंत्रणासाठी थायमिथोक्झाम १२.६ लंगडा सायहॅलोथ्रीन ९.५% भेडसी प्रती ५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किवा
> नवीन लष्करी अळीची प्रभावी नियंत्रणासाठी क्लोरोॲट्रानिलीप्रोल १८.५% एससी प्रती ५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
> नवीन लष्करी अळीच्या नियंत्रासाठी पिकाच्या पोगा मध्ये मेटारायझीअम अनीसोप्लिी प्रती ५ ग्रॅम प्रती पोगा या प्रमाणे वापरावे. (१० दिक्साच्या अंतराने पुन्हा एकदा वापरावे.)
- अभिमन्यू काशीद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक