Krushi Salla : सद्यस्थितीत मका पीक दाणे भरणे ते पीक परिपक्वतेच्या अवस्थेत तर सोयाबीन पीक फुले लागणे ते शेंगा भरणेची अवस्थेत तसेच भुईमूंग पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी पुढील नियोजन काय करावे, हे समजून घेऊयात....
मका पीक
मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ४ ग्राम प्रती १० लि. पाण्यात किंवा थायोमेथोक्झाम + ल्याम्बडा सायहेलोथ्रीन @ ३ मिली प्रती १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मका पिकास नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक या बरोबरच जस्त या अन्नद्रव्याचा वापर करणे पीक पोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
सोयाबीन पीक
सोयाबीनची अतिरिक्त कायिक वाढ रोखून उत्पादकता वाढविण्यासाठी, पीक फुले लागण्याच्या अवस्थेत असताना सायकोसील (क्लोरमेक्लॅट क्लोराईड ५० एसएल) या संजीवकाच्या ५०० पी.पी.एम. द्रावणाची (१ मिलि प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.
सोयाबीनवरील हेलीकोव्हर्पा, उंट अळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा नियंत्रणासाठी, क्किनालफॉस ०.२% किंवा प्रोफेनोफॉस ०.२% २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच सोयाबीनवरील खोडमाशीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील ०.२% २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भुईमुंगसाठी अन्नद्रव्य फवारणी
भुईमुगाच्या शेंगा भरत असताना आकार व वजन वाढण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश (०-०-५०) ७५ ग्रॅम अधिक मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट ५० ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
(नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता वरील सर्व कामे प्रसारित केलेल्या दिवसाकरिता स्थगित कराव्यात.)
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी