Lokmat Agro >स्मार्ट शेती > Krushi Salla : मराठवाड्यातील हवामानात बदल; पिकांची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर

Krushi Salla : मराठवाड्यातील हवामानात बदल; पिकांची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर

latest news Krushi Salla: Weather changes in Marathwada; How will you take care of crops? Read in detail | Krushi Salla : मराठवाड्यातील हवामानात बदल; पिकांची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर

Krushi Salla : मराठवाड्यातील हवामानात बदल; पिकांची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर

Krushi Salla : कापूस, तूर, भुईमूग, भाजीपाला व फळबाग पिकांसाठी हवामान अनुकूल राखण्यासाठी काय करावे याविषयीचा कृषी आधारित हवामान सल्ला वाचा सविस्तर (Krushi Salla)

Krushi Salla : कापूस, तूर, भुईमूग, भाजीपाला व फळबाग पिकांसाठी हवामान अनुकूल राखण्यासाठी काय करावे याविषयीचा कृषी आधारित हवामान सल्ला वाचा सविस्तर (Krushi Salla)

शेअर :

Join us
Join usNext

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पिकांवर ताण पडू न देता वेळेवर पाणी, तण व किडरोग व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने दिला आहे.(Krushi Salla)

कापूस, तूर, भुईमूग, भाजीपाला व फळबाग पिकांसाठी हवामान अनुकूल राखण्यासाठी काय करावे याविषयीचा कृषी आधारित हवामान सल्ला वाचा सविस्तर(Krushi Salla)

हवामानाचा आढावा व अंदाज

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार मराठवाड्यात १७ जुलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत, १८ जुलै रोजी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह ३०–४० किमी/ताशी)मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात आज (१७ जुलै) रोजी काही ठिकाणी पाऊस पडेल. तर १८ जुलै रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, मात्र नंतर हळूहळू २–३ अंशांनी वाढ होईल. किमान तापमान स्थिर राहील.

सामान्य शेतकरी सल्ला

* ज्या भागात ७५–१०० मिमी पाऊस झाला आहे आणि अजून पेरणी नसेल, तिथे सूर्यफूल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन+तूर (४:२), बाजरी+तूर (३:३), एरंडी, कारळ, तिळ, धणे यांची पेरणी करावी.

पीक व्यवस्थापन

कापूस

लागवडीनंतर १ महिना झाल्यास १ % पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी.

कोरडवाहू कापसास ३६ किलो व बागायतीस ६० किलो नत्र/हेक्टरी वरखत द्यावे.

रसशोषक किडींसाठी ५% निंबोळी अर्क किंवा ॲसिटामिप्रिड २०% @२ ग्रॅम/१० लि. पाण्यात फवारणी करावी.

शंखी गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड @२ किलो/एकर पसरावे.

तूर

१ % पोटॅशियम नायट्रेट फवारणी.

तण नियंत्रण व शंखी गोगलगायी व्यवस्थापन करावे.

मुग/उडीद/भुईमूग/मका

१ % पोटॅशियम नायट्रेट फवारणी.

तण विरहित ठेवणे व शंखी गोगलगायीवर नियंत्रण.

ऊस

पाण्याचा ताण कमी करण्यासाठी सूक्ष्म सिंचन.

पांढरी माशी नियंत्रणासाठी जैविक बुरशी किंवा रासायनिक फवारणी.

फळबाग व्यवस्थापन

पाणी व्यवस्थापनात सूक्ष्म सिंचन वापरा.

आंब्यासाठी ००:५२:३४ @१५ ग्रॅम/लिटर पाण्यात फवारणी.

द्राक्षात बगल फुटी काढून, वेलीची बांधणी करावी.

शंखी गोगलगायीवर नियंत्रण (सर्व फळपिकांत).

भाजीपाला व फुलशेती

ओलावा तपासून भाजीपाला रोपांची पुर्नलागवड किंवा बी पेरणी करावी.

रसशोषक किडींवर पायरीप्रॉक्सीफेन+फेनप्रोपाथ्रीन किंवा डायमेथोएट फवारणी करावी

फुलपिके वेळेवर काढणीस घ्यावी व ओलावा असल्यास पुर्नलागवड करावी.

पशुधन व्यवस्थापन

लम्पी स्कीन आजारापासून वासरांचे संरक्षण.

लसीकरण, योग्य आहार-पाणी व आजारी प्राण्यांना विलगीकरण.

महत्वाचा संदेश

हवामान सतत बदलत असल्यामुळे प्रत्येक काम करताना स्थानिक हवामानाचा अंदाज पाहून नियोजन करावे.

शेतात तण नियंत्रण, पाण्याचा बचतपूर्वक वापर व किडरोग नियंत्रणाला प्राधान्य द्यावे.

(सौजन्य : ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

हे ही वाचा सविस्तर :Spraying Protection : फवारणी करताना छोटी चूक, मोठं नुकसान करेल; वाचा सुरक्षिततेचे उपाय

Web Title: latest news Krushi Salla: Weather changes in Marathwada; How will you take care of crops? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.