Join us

Krushi Salla : हवामानात बदलाची चिन्हे; रब्बी पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी 'या' उपाययोजना कराव्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:52 IST

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी पूर्ण करून रब्बी हंगामासाठी तयारी सुरू करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. (Krushi Salla)

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी पूर्ण करून रब्बी हंगामासाठी तयारी सुरू करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. (Krushi Salla)

हवामानाचा अंदाज

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस मराठवाडा आणि विदर्भ भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वारे आणि ढगाळ वातावरण राहणार आहे. दिवसाच्या तापमानात किंचित घट होईल, तर रात्री गारवा वाढेल.

या काळात वातावरण आर्द्र असल्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि भाजीपाला पिकांवर कीड-रोगाचा धोका वाढू शकतो, म्हणून योग्य उपाययोजना कराव्यात.

पिकनिहाय सल्ला 

सोयाबीन पिकाची काढणी तातडीने पूर्ण करून काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे. वाळल्यानंतरच मळणी करावी.

तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५% (२० मिली / १० लि. पाणी) फवारणी करावी.

ऊस पिकात पांढरी माशी आणि पाकोळीचा प्रादुर्भाव दिसल्यास जैविक बुरशी लिकॅनीसिलियम लिकॅनी (४० ग्रॅम / १० लि. पाणी) किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८% (३ मिली / १० लि. पाणी) फवारावे.

हरभरा आणि करडई पेरणीपूर्वी बियाण्यावर ट्रायकोडर्मा किंवा थायरमद्वारे बिजप्रक्रिया करावी. हरभऱ्यासाठी लहान वाण ६० किलो, तर काबुली वाणासाठी १०० किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.

भाजीपाला आणि फुलपिके (झेंडू, आष्टूर, गुलाब) यांच्या काढणी व लागवडीच्या कामांसाठी हीच योग्य वेळ आहे.

पशुधनासाठी हिरवा व सुका चारा संतुलित प्रमाणात द्यावा, तसेच खनिज मिश्रण नियमित वापरावे.

रब्बी हंगामासाठी सल्ला

गहू व हरभरा पिकांची तयारी : पेरणीपूर्वी मातीची नांगरट करून शेणखत किंवा कंपोस्ट टाका.

पाण्याचे नियोजन : अलीकडील पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून आहे, त्यामुळे आत्ता जमिनीतील आर्द्रता जपून ठेवावी.

बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रती किलो बियाण्याने बीजप्रक्रिया करावी.

पाणी व माती संवर्धन सल्ला

शेताच्या कडेला लहान तटबंदी करून पाण्याचा अपव्यय टाळा.

पावसाच्या साचलेल्या पाण्याचा वापर शेततळी किंवा बंधाऱ्यांत साठवण्यासाठी करा.

शेतकऱ्यांसाठी सूचना

हवामानातील बदल लक्षात घेऊन फवारणी किंवा काढणी पुढे-मागे करावी.

बाजारातील दरांचे सतत निरीक्षण ठेवून विक्री निर्णय घ्यावा.

कृषी विभागाकडून येणारे हवामान संदेश आणि मोबाइलवरील सूचना नियमित पाहाव्यात.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी व नियोजन हेच रब्बी हंगामातील यशाचे गमक ठरणार आहे. योग्य वेळी सल्ला घेऊन पिकांचे संरक्षण करा आणि उत्पादन वाढवा.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Tur Mar Rog : जमिनीतील वाढत्या आर्द्रतेने तुरीवर 'मर'; 'या' करा उपाययोजना

English
हिंदी सारांश
Web Title : Agriculture Advice: Prepare for Rabi Season Amidst Rainfall Forecast

Web Summary : Marathwada farmers advised to complete Kharif harvesting, prepare for Rabi. Expect light to moderate rain, take precautions against pests in soybean, cotton, and vegetables. Plan sowing of gram and safflower, and protect livestock.
टॅग्स :शेती क्षेत्रमराठवाडाशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनपीकखरीपरब्बी