Krushi Salla : मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून, वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. (Krushi Salla)
यासोबतच पिकांवर येणाऱ्या अळ्या, रोग आणि ताण नियंत्रित ठेवण्यासाठी कृषी विद्यापीठांकडून दिलेले मार्गदर्शन तुम्हाला मदतीचे ठरणार आहे. हा सविस्तर हवामान व कृषि सल्ला वाचून आपली शेती अधिक सुरक्षित बनवा. (Krushi Salla)
हवामान अंदाज
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात काही भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे, मेघगर्जनेसह वादळी स्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदार घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तापमानाचा कल
कमाल तापमान २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.
किमान तापमानात फारसा बदल जाणवणार नाही.
०७ ऑगस्टदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, तर
०८ ते १४ ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते किंचित जास्त राहील, असा अंदाज आहे.
पिकनिहाय सल्ला
सोयाबीन
अळ्या आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसल्यास योग्य कीटकनाशक फवारणी करावी.
सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेसाठी मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 फवारणी करावी.
पिवळा मोझॅक ग्रस्त झाडे नष्ट करावीत.
खरीप ज्वारी
लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट / स्पिनेटोरमची फवारणी.
एक महिन्यानंतर उर्वरीत खतमात्रा द्यावी.
बाजरी, ऊस व हळद
अंतरमशागती, तण नियंत्रण आणि योग्य खत व्यवस्थापन आवश्यक आहे.
पाकोळी, माशी व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास जैविक किंवा रासायनिक उपाय करावेत.
भाजीपाला
शेंडा-फळ पोखरणाऱ्या अळींसाठी कामगंध सापळे किंवा योग्य कीटकनाशक वापरावे.
डाऊनी मिल्ड्यूसाठी मेटालॅक्झील + मॅन्कोझेब फवारणी करावी.
फळबाग व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी
पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
१९:१९:१९ खत फवारणी आणि कीटकनियंत्रण उपाय.
डाळिंब
अतिरिक्त फुटवे काढून अंतरमशागती करावी.
सूक्ष्म सिंचनाने खत व्यवस्थापन करावे.
फुलपिके व तुती शेती
काढणीस तयार फुलांची वेळेत काढणी करावी.
तुती संगोपनासाठी योग्य जागेची रचना, कोष उत्पादनाचा अंदाज: ५ लाख रुपये/एकर पर्यंत उत्पन्न शक्य आहे.
पशुधन व कुक्कुटपालन
शेड कोरडे व हवेशीर ठेवावे.
स्वच्छ पाणी व निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी.
नियमित निर्जंतूकीकरण करून परोपजिवी नियंत्रण करावे.
महत्त्वाचा संदेश
आगामी काळातील हवामान आणि तापमानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिके, बागा आणि पशुधन यांचे योग्य व्यवस्थापन करावे. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगून हवामानाचा अंदाज डोळ्यांत ठेवून शेतीची कामे करावीत, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल.