Join us

Krushi Salla : जुलै महिन्यात शेतकऱ्यांनो करा 'ही' कामे; पेरणीवर विद्यापीठाचा सल्ला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:08 IST

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा आणि काही भागांत वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान केंद्र व कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस न झाल्यापर्यंत घाई न करण्याचा सल्ला दिला असून, पिकांना ताण टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर (Krushi Salla)

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही भागांत वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Krushi Salla) 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेने शेतकऱ्यांना पिकांच्या पेरण्या आणि व्यवस्थापनासाठी महत्वाचा सल्ला दिला आहे.(Krushi Salla) 

पावसाचा अंदाज 

३ व ४ जुलै : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

५ जुलै : छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.

काही भागांत वाऱ्याचा वेग ३०–४० किमी/ताशी आणि वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांसाठी महत्वाचा संदेश

* सध्या बहुतांश ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (७५–१०० मिमी) झालेला नाही.

* त्यामुळे पेरणीची घाई करू नका.

* पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करून पेरणी करा.

* १५ जुलैपर्यंत बहुतांश खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग वगळता) पेरणी करता येऊ शकते.

पीक व्यवस्थापन

कापूस

पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच लागवड करा.

लागवड केलेल्या पिकात तणनियंत्रण करा.

पाण्याचा ताण जाणवला तर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करा.

तूर

पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर पेरणी.

लागवडीनंतर तणनियंत्रण आणि पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी.

मूग/उडीद

जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी.

पिकाला पाणी ताण पडू नये यासाठी सूक्ष्म सिंचन.

भुईमूग

७ जुलैपर्यंत पेरणी करावी.

तणनियंत्रण आणि पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी.

मका

जुलै अखेरपर्यंत पेरणी करता येते.

फळबाग व्यवस्थापन

केळी/आंबा/सिताफळ : लागवड करताना शासकीय रोपवाटीकांची रोपेच वापरा.

खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा आणि ठिबक सिंचनाचा अवलंब करा.

द्राक्ष : रोगग्रस्त पाने काढून टाका, वेली बांधा, सूर्यप्रकाश पोहोचेल याची काळजी घ्या.

भाजीपाला व फुलशेती

भाजीपाल्याची (वांगी, मिरची, टोमॅटो) गादीवाफ्यावर रोपे तयार करा.

लागवड करण्यापूर्वी जमिनीत ओलावा आहे का तपासा.

काढणीस तयार भाजीपाला/फुलांची काढणी करा.

पशुधन व्यवस्थापन

* गोठ्यात स्वच्छता ठेवा, पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.

* दर १५ दिवसांनी पोटॅशियम परमॅंगनेटने निर्जंतुकीकरण करा.

* माशा व कीटकांचे नियंत्रण करा.

पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. पिकांना वाचवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी दिलेल्या सल्ल्याचे पालन करा. हवामानाचा अंदाज सतत तपासून योग्य वेळीच शेतीची कामे हाती घ्या.

(सौजन्य : ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Pik : सोयाबीन पिकांवर संकट; 'ही' फवारणी ठरत आहे रामबाण उपाय वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीहवामान अंदाजपाऊसपेरणीमराठवाडा