Kobi Lagvad : कोबीवर्गीय पिकांमधील (फुलकोबी, कोबी) 'ब्लाइंडनेस' किंवा वांझ रोप ही एक शारीरिक विकृती आहे, ज्यामध्ये रोपाच्या मध्यवर्ती भागातील वाढ खुंटते किंवा शेंडा तुटतो, ज्यामुळे गड्डा किंवा कोबी तयार होत नाही. या रोगाची आणखी काय कारणे आहे, त्यावर उपाय काय हे पाहुयात...
कोबीवर्गीय पिके ब्लाइंडनेस (वांझ रोप)
ही विकृती कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर आढळून येते. रोपाचा शेंडा विकसित होत नाही. कमी तापमान, शेंडा खुडला गेल्यास किंवा कीड-रोगांमुळे त्याला इजा झाल्यास अशा रोपाला गड्डा धरत नाही. रोपांची पाने रुंद, मोठी, गडद हिरवी आणि जाडसर राठ असतात.
उपाययोजना
- लागवडीसाठी निरोगी जोमदार आणि शेंडा असलेली रोपे निवडावीत.
- रोपांची पुनर्लागवडीच्या वेळी काळजीपूर्वक हाताळणी करावी.
- कमी तापमान असल्यास पुनर्लागवड टाळावी. योग्य तापमानात करावे.
- वांझ रोपे शेतातून काढून टाकून त्यांचा त्वरित नायनाट करावा.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी
Harbhara Market : हरभरा हमीभाव गाठणार का, फेब्रुवारीचे उर्वरित 20 दिवस कसे असतील दर
