Lokmat Agro >स्मार्ट शेती > Khol Nangrat : खोल नांगरट का आणि कशाने करावी? तिचे फायदे काय? समजून घेऊया... 

Khol Nangrat : खोल नांगरट का आणि कशाने करावी? तिचे फायदे काय? समजून घेऊया... 

Latest News Khol Nangrat Why and how to do deep ploughing see benefits read in details | Khol Nangrat : खोल नांगरट का आणि कशाने करावी? तिचे फायदे काय? समजून घेऊया... 

Khol Nangrat : खोल नांगरट का आणि कशाने करावी? तिचे फायदे काय? समजून घेऊया... 

Khol Nangrat : वेगवेगळ्या सिंचन पद्धती, पारंपारिक शेतीपद्धती व यांत्रिकारणाचे परिणाम या सर्वांचा मातीवर (Soil Plough) परिणाम होत आहे.

Khol Nangrat : वेगवेगळ्या सिंचन पद्धती, पारंपारिक शेतीपद्धती व यांत्रिकारणाचे परिणाम या सर्वांचा मातीवर (Soil Plough) परिणाम होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Khol Nangrat :  बदलते वातावरण तसेच वेगवेगळ्या पीकपद्धती, अति रासायनिक खताचा वापर, अतिवृष्टी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, वेगवेगळ्या सिंचन पद्धती, पारंपारिक शेतीपद्धती व यांत्रिकारणाचे परिणाम या सर्वांचा मातीवर (Soil Plough) परिणाम होत आहे. जमिनीमध्ये टणक, कठीण थर निर्माण होत आहे. यावर खोल नांगरट हा उत्तम पर्याय आहे.

खोल नांगरट म्हणजे काय ?
जमिनीच्या पृष्ठभागाखालील निर्माण झालेला घट्ट थर फोडला जातो. जमीन सैल केली जाते व जमीन भूसभूशीत होते. साधारण जमिनीच्या प्रकारानुसार हि खोल नांगरट २ ते २.५ फूटापर्यंत केली जाते.

खोल नांगरटीचे फायदे

  • खोल नांगरेटीमुळे जमिनीतील तयार झालेला कडक थर फोडला जातो
  • खोल नांगरटीच्या माध्यमातून म्हणजेच Subsoiling मुळे जमिनी व पाण्याचे संवर्धन होते.
  • पिकांना सहजपणे आणि सुलभतेने अन्नद्रव्ये जमिनीतून घेता येतात.
  • पाण्याचे शोषण जमिनीत जास्त प्रमाणात होते.
  • पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
  • पिकांची वाढ चांगली होते व उत्पन्नात वाढ होते.
  • पावसामुळे पिकाचे नुकसान होत नाही. पिक पाण्यात न राहता पिकांचे सडणे टाळले जाते.
  • पाणी जमिनीवर साचून न राहता व्यवस्थित मुरले जाते.
  • खोल नांगरट दोन ते तीन वर्षातून एकदा केली तरी चालते त्यामुळे जमिनीचे संवर्धन तर होतेच सोबतच पैशांची व वेळेची ही बचत होते.

 

खोल नांगरट कशाने करावी ?
खोल नांगरटीसाठी एक ट्रॅक्टर चलीत मशीन उपलब्ध आहे. त्या मशीनचे नाव सबसॉईलर हे आहे. ही मशीन जमिनीमधील कडक थर फोडण्याचे व जमिन भुसभुशीत करण्याचे काम करते.

खोल नांगरटीची उत्तम वेळ
खोल नांगरट ही दोन ते तीन वर्षातून एकदा करावी व नोव्हेंबर ते मे महिन्यामध्ये खोल नांगरट केल्यास चांगले परिणाम मिळतात.

- डॉ. प्रियंका राजकुमार खोले, विषय विशेषज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी

Web Title: Latest News Khol Nangrat Why and how to do deep ploughing see benefits read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.