Lokmat Agro >स्मार्ट शेती > Kharif Crop Management : शेतकऱ्यांनो! अतिवृष्टीनंतर खरीप पिकांसाठी 'या' करा उपायायोजना; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Kharif Crop Management : शेतकऱ्यांनो! अतिवृष्टीनंतर खरीप पिकांसाठी 'या' करा उपायायोजना; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

latest news Kharif Crop Management: Farmers! 'Come' and plan for Kharif crops after heavy rains; Read expert advice | Kharif Crop Management : शेतकऱ्यांनो! अतिवृष्टीनंतर खरीप पिकांसाठी 'या' करा उपायायोजना; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Kharif Crop Management : शेतकऱ्यांनो! अतिवृष्टीनंतर खरीप पिकांसाठी 'या' करा उपायायोजना; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Kharif Crop Management : मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तुर आणि हळद या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोग, कीड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढली आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी आणि तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना जाणून घ्या...

Kharif Crop Management : मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तुर आणि हळद या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोग, कीड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढली आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी आणि तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना जाणून घ्या...

शेअर :

Join us
Join usNext

Kharif Crop Management : मागील काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आणि हळद या पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. (Kharif Crop Management)

शेतात पाणी साचल्यामुळे बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित अतिरिक्त पाण्याचा निचरा करून पुढील काळात खालील शिफारसींचे पालन करणे गरजेचे आहे. (Kharif Crop Management)

सोयाबीन पिकाची काळजी

शेतातील अतिरिक्त पाणी ताबडतोब काढून टाकावे.

शंखी गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डीहाईड २ किलो/एकर वापरावा.

पाने खाणाऱ्या अळ्या, खोडकिडी, शेंगा पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी एक कीटकनाशक फवारावे:

क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५% – ६०  मिली/एकर

इंडाक्झाकार्ब १५.८% – १४० मिली/एकर

असिटामाप्रीड २५% + बायफेनथ्रिन २५% – १०० ग्रॅम/एकर

बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल, पायरोक्लोस्ट्रोबीन किंवा इपिक्साकोनाझोल मिश्रण फवारणी करावी.

ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स ४ किलो/एकर आळवणी करावी.

कपाशीची काळजी

अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी ओळी सोडून चर काढावेत.

आकस्मिक मर दिसल्यास युरिया + पांढरा पोटॅश + कॉपर ऑक्सिक्लोराईड यांचे मिश्रण आळवणी करावे.

६० दिवसानंतर नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.

नैसर्गिक पातेगळ थांबवण्यासाठी NAA ४० मिली/१८० लिटर पाणी फवारावे.

रस शोषक किडी व बोंडसड रोग नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड, स्ट्रेप्टोमायसीन किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन मिश्रण वापरावे.

तुर पिकाची काळजी

शेतातील साचलेले पाणी तात्काळ बाहेर काढावे.

मरग्रस्त झाडे उपटून काढावीत व त्या ठिकाणी कार्बेन्डाझीमची आळवणी करावी.

कॉपर ऑक्सिक्लोराईड + युरिया + पोटॅश यांचे मिश्रण मुळाशी द्यावे.

ट्रायकोडर्मा / बायोमिक्स ४ किलो/एकर वापरावे.

हळद पिकाची काळजी

कंदमाशी नियंत्रणासाठी १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस किंवा डायमिथोएट फवारणी करावी.

उघडे कंद मातीने झाकावेत व वेळेवर भरणी करावी.

करपा, पानावरील ठिपके, कंदकुज रोगासाठी कार्बेन्डाझीम, मॅन्कोझेब किंवा ॲझोक्सीस्ट्रोबीन मिश्रण फवारणी करावी.

ट्रायकोडर्मा २ ते २.५ किलो/एकर शेणखतात मिसळून द्यावे.

विशेष काळजी घ्यावी

* फवारणी करण्यापूर्वी पावसाचा अंदाज लक्षात घ्यावा.

* कीटकनाशके व बुरशीनाशके एकत्र मिसळू नयेत.

* स्वच्छ पाणी व शिफारस केलेले प्रमाण वापरावे.

* शेतात स्वच्छता राखावी आणि रोगट पाने नष्ट करावीत.

* फवारणीवेळी योग्य संरक्षक साधनांचा वापर करावा.

अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
फोन नंबर ०२४५२-२२९०००; व्हॅट्स ॲप हेल्पलाईन –८३२९४३२०९७ 

(लेखक डॉ. जी. डी. गडदे, डॉ. डी. डी. पटाईत, श्री. एम. बी. मांडगे हे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कार्यकरत आहेत.)

हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : मराठवाड्यात पाऊस; शेतकऱ्यांसाठी खास कृषी मार्गदर्शन वाचा सविस्तर

Web Title: latest news Kharif Crop Management: Farmers! 'Come' and plan for Kharif crops after heavy rains; Read expert advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.