Lokmat Agro >स्मार्ट शेती > Kanda Sathavnuk : कांदा साठवणुकीत कोणते रोग येतात? रोग येऊ नये म्हणून काय करावे? 

Kanda Sathavnuk : कांदा साठवणुकीत कोणते रोग येतात? रोग येऊ नये म्हणून काय करावे? 

Latest news Kanda Sathvanuk Onion Disease Possibility of disease outbreak on onions after storage | Kanda Sathavnuk : कांदा साठवणुकीत कोणते रोग येतात? रोग येऊ नये म्हणून काय करावे? 

Kanda Sathavnuk : कांदा साठवणुकीत कोणते रोग येतात? रोग येऊ नये म्हणून काय करावे? 

Kanda Sathavnuk : अनेकदा साठवणूक केल्यानंतर कांद्यावर (Onion Disease) काही रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

Kanda Sathavnuk : अनेकदा साठवणूक केल्यानंतर कांद्यावर (Onion Disease) काही रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Sathavnuk : सध्या कांदा काढणी (Kanda Kadhani) सुरु असून अनेक शेतकरी साठवणुकीकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे कांदा चाळी दुरुस्ती, नवीन तयार करणे ही कामेही सुरु आहेत. मात्र अनेकदा साठवणूक केल्यानंतर कांद्यावर (Onion Disease) काही रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशावेळी कोणकोणते रोग येतात आणि कशी काळजी घ्यावी, हे आजच्या लेखातून पाहुयात.... 

कांद्याच्या साठवणुकीत काळी बुरशी, फ्युझेरियम बेस रॉट, अंकुरण, पाण्यासारखे खवले येणे, दुप्पट/जुळे होणे, बेसल प्लेट फुटणे आणि जाड मान यासारखे रोग होतात. हे रोग बुरशी आणि सूक्ष्मजीवांमुळे होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीदरम्यान देखील विशेष काळजी घ्यावी लागते. जेणेकरून साठवणुकीत कमीत कमी नुकसान होईल. 

मानकूज रोग 

  • मानकूज हा बुरशीजन्य रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव कांदा काढणीला आल्यावर तेव्हा होते. 
  • मात्र या रोगाची लक्षणे कांदा चाळीत भरल्यानंतर दिसू लागतात. 
  • या रोगाची बुरशी पानामधून ते कांद्याच्या मानेपर्यंत पोहोचते. 
  • यासाठी कांदा काढल्यानंतर तो व्यवस्थित सुकवला नाही तर या रोगाचे प्रमाण वाढते. 
  • कांदा काढणीनंतर शेतातच पातीसह सुकू द्यावा. 
  • नंतर लांब मान कापून प्रतवारी करून सावलीत दहा ते पंधरा दिवस सुकवून मग चाळीत भरावा.

काळी बुरशी रोग 

  • काळीबुरशी हा देखील एक बुरशीजन्य रोग आहे. 
  • या रोगाची लागण कांद्याचे काढणी झाल्यानंतर कांद्याच्या वरच्या भागाकडून होते. 
  • कांद्याच्या वरच्या पापुद्रा च्या आत असंख्य पुंजके दिसतात. 
  • बुरशीची वाढ होऊन वरच्या एक-दोन पापुद्रापर्यंत पोहोचते. काही काळानंतर कांद्याचा पृष्ठभाग काळा होतो. 
  • मानकूज रोगासाठी जे व्यवस्थापन करावे लागते, त्याच्या रोगासाठी ही करावे.

 

निळी बुरशी रोग 

  • निळी बुरशी  हा रोग पेनिसिलियम नावाच्या बुरशीमुळे होतो. 
  • या रोगात सुरुवातीला कांद्यावर खोलगट पिवळे डाग पडतात. ते लगेच हिरवट निळसर होतात.
  • या रोगामुळे कांदा सड मोठ्या प्रमाणात वाढते. 
  • इतर साठवणुकीतील रोगावर करण्यात येणारे व्यवस्थापन याही रोगास लागू पडते.

 

काजळी रोग 

  • काजळी हा देखील बुरशीजन्य रोग असून या रोगाची सुरुवात कांदा काढणीपूर्वी काही दिवस अगोदर होते. 
  • या रोगाचा प्रसार कांदा चाळीत साठवल्यानंतर वाढते. 
  • कांद्याच्या वरच्या आवरणावर लहान गर्द हिरवा किंवा काळा ठिपका पडतो. 
  • ठिपक्यांचा आकार कालांतराने वाढत जातो. 
  • नियंत्रणासाठी कांदा काढणीपूर्वी बुरशीनाशकाची इतर साठवणुकीत येणाऱ्या रोगाप्रमाणे फवारणी करावी. 
  • कांदा चांगला सुकवून साठवून गृहात भरावा.

 

Kanda Sathvanuk : कांदा साठवणूक करतांना 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे कांदा जास्त काळ टिकेल!

Web Title: Latest news Kanda Sathvanuk Onion Disease Possibility of disease outbreak on onions after storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.