Lokmat Agro >स्मार्ट शेती > कांदा रोपवाटिका सपाट वाफ्यापेक्षा गादीवाफ्यावर करणे फायद्याचे, वाचा सविस्तर 

कांदा रोपवाटिका सपाट वाफ्यापेक्षा गादीवाफ्यावर करणे फायद्याचे, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Ropvatika beneficial to grow onion seedlings on raised beds than on flat beds, read in detail | कांदा रोपवाटिका सपाट वाफ्यापेक्षा गादीवाफ्यावर करणे फायद्याचे, वाचा सविस्तर 

कांदा रोपवाटिका सपाट वाफ्यापेक्षा गादीवाफ्यावर करणे फायद्याचे, वाचा सविस्तर 

खरीप कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी बियाण टाकताय? थोडं थांबून मिराताई आणि तुकाराम भाऊचा संवाद ऐका

खरीप कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी बियाण टाकताय? थोडं थांबून मिराताई आणि तुकाराम भाऊचा संवाद ऐका

शेअर :

Join us
Join usNext


मंडळी रामराम! 

खरीप कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी बियाण टाकताय? थोडं थांबून मिराताई आणि तुकाराम भाऊचा संवाद ऐका आणि मग ठरवा कशी करायची यंदा कांदा रोपवाटिका?           
                              
मीराताई : काय तुकारामभाऊ, कांद्याची रोपवाटिका तयार केली का?
तुकाराम : हो मीराताई, पण काळजी वाटतेय. रोपं काहीशी पिवळी पडायला लागलीत. पाणी दिल्यानंतर वाफ्यात पाणी साचतंय. 

मीराताई (हसत) : म्हणून आम्ही गादीवाफ्यावर रोपवाटिका करतो! बघा भाऊ 
तुकाराम : गादीवाफा हे काय असतंय आणि त्यानं काय होतंय आणि त्यो कसा करायचा ? 

 मिराताई : चल सांगते.. अरं यामुळं 
पाण्याचा निचरा योग्य होतो, त्यामुळे मुळं कुजत नाहीत.
माती भुसभुशीत राहते आणि मुळांना हवा मिळते.
बुरशी व किडींपासून बचाव होतोm
रोपं जोमदार, हिरवीगार वाढतात. 

गादीवाफा कसा तयार करायचा? 

लांबी: ३ मीटर (१० फूट)
रुंदी: १ मीटर (३ फूट)
उंची: १५–२० से.मी. (६–८ इंच)

माती भुसभुशीत करून त्यात चांगले कुजलेले शेणखत व कंपोस्ट मिसळायचं 
वाफ्याच्या बाजूला लहान नाल्या तयार करा जेणेकरून पाणी सहज निचरा होईल.
नंतर रांगेत बियाणं पेरायच किंवा  लावायच. 

तुकाराम : पण मीराताई, कांद्याचं बियाणं जुने आहे. उगम होईल का कसं कळणार?
मीराताई : खूप सोपं आहे भाऊ! 
१०० बियाणे निवडा.
त्यांना ओलसर कापडात गुंडाळा किंवा ताटलीत ठेवा.
रोज थोडंसं पाणी शिंपडा!
७-८ दिवसांनी मोजा किती बियाण्यांनी उगम घेतला. 
 ७५-८०% उगम झाला असेल, तर बियाणं वापरण्यास योग्य आहे. 

मीराताई : आणि हो, बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी बिजप्रक्रिया करावीच लागते. 
थायरम किंवा कार्बेन्डाझिम (2 ग्रॅम प्रति किलो बियाणे) याने बियाणं चोळावं.
नंतर 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणे याने प्रक्रिया करा.
हे केल्याने मातीतील बुरशींपासून बचाव होतो आणि उगम टक्केवारी वाढते.

तुकाराम : म्हणजे मी सपाट वाफ्यात उगम घेतलेली रोपं धोक्यात टाकलीत.
मीराताई : हो भाऊ! सपाट वाफ्यात पाणी साचतं, माती घट्ट होते, किडी-रोग वाढतात. गादीवाफ्यावर अशी समस्या होत नाही, अरं हे सगळं शिकाया तर जातोय बघ आम्ही शेतीशाळेला.

तुकाराम (हसत) : मीराताई, पुढच्या वेळी गादीवाफा, बियाण्याची उगमक्षमता तपासणी आणि बिजप्रक्रिया तिन्ही करतो! आणि होय शेतीशाळेला सुद्धा येतो बघ. 
मीराताई : बरोबर! या पद्धतींनी कांद्याची रोपं जोमदार होतील, रोपं जोमदार तर पिक जोरदार आणि मग उत्पादन हमखास वाढल. 

- श्रीमती सोनाली कदम, सहाय्यक कृषि अधिकारी, आडगाव चोथवा, तालुका- येवला, जिल्हा- नाशिक

Web Title: Latest News Kanda Ropvatika beneficial to grow onion seedlings on raised beds than on flat beds, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.