Kanda Farming : रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर वाढल्याने शेतीत उत्पादन कमी झाले आहे. शिवाय परागीभवनासाठी (Pollination) महत्वाचा समजला मधमाशी हा घटक देखील कमी होऊ लागला आहे. याचाही परिणाम उत्पादनावर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांसाठी परागीभवनासाठी (Paragi Bhavan) महत्वाचा सल्ला या लेखातून समजून घेऊयात....
गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बीज लागवड केली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जोरदार गारपिटीमुळे हा कांदा हातचा गेला होता. तसेच ज्या भागात गारपीट झाली नाही, त्या भागात हाती आलेल्या कांदा बीजालाही (Kanda Bijotpadan) दोन हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farming) यावर्षी कांदा लावण्यासाठी धजावलेला नसल्याचे दिसून येत आहे.
हेही समजून घ्या....
कांदा फुल दांडे लागवडीनंतर ४५ दिवसांनी येण्यास सुरुवात होते. फुले ऊमलण्यास ६५ ते ७० दिवस लागतात. एकाच गोंड्यातील फुले एकाच वेळी उमलत नाहीत. नवीन फुल दांडे येणे व फुले उमलणे हि प्रक्रिया एक ते सव्वा महिना चालू राहते. म्हणजेच जवळजवळ ६५ ते ९० दिवस. जेंव्हा शेतात १५ ते २० टक्के फुले उमलतात. तेंव्हा साधारणतः ७०-९० दिवसां दरम्यान कृत्रिम परागीकरण प्रक्रिया सुरू करावी.
हा अनुभवही वाचाच....
कांदा फुलात परागीभवन होत असते व त्यासाठी बियाणे प्लॉटमध्ये मधमाशी असणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांत असे दिसून येते आहे की, मधमाशी कांदा बियाणे प्लॉटमध्ये येत नाही. कांद्याची स्टिग्मा तीन दिवसांपर्यंत रीसेप्टिव असते. त्या दरम्यान फलन होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी सुती कपडा फिरवण्यासाठी सांगितले जाते.
फक्त पूर्ण कपडा फिरवण्याऐवजी आपण कमीअधिक उंचीच्या पट्टया कापण्यास सांगितले जाते. हा कपडा सकाळी साडे आठ ते दहा वाजेच्या दरम्यान फिरवावा लागतो. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. एरवी मधमाशी येण्यासाठी पिक ३५ दिवसाचे झाल्यावर शेतात जागोजागी गावठी धने, ओवा, बडीशेप, गाजर, मुळा बुडख्या व मोहरी लावले तरी चालत असल्याचा अनुभव तुषार आंबेरे यांनी सांगितला.
सद्यःस्थितीत कांदा शेती फुलोऱ्यात असली तरी पिकावर मधमाशी दिसत नसल्याने आता चिंता वाढली आहे. कांदा फुलांचे परागसिंचन होण्यासाठी मधमाशांची आवश्यकता असते. आता केवळ हवेमुळे होणाऱ्या परागसिंचनातूनच जे उत्पन्न हाती पडेल त्यावरच सर्व मदार आहे.
- नानासाहेब त्र्यंबक सोनवणे, कांदा उत्पादक शेतकरी