Join us

Kanda Crop Management : रांगडा कांद्याचे उभे पीक असतांना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 21:40 IST

Kanda Crop Management : काही ठिकाणी लागवड होऊन काही दिवस उलटून गेल्याने कांदा पीक (Kanda Crop) तरारले आहे.

Kanda Crop Management : सध्या नाशिकसह (Nashik) राज्यातील कांदा पट्टा असलेल्या भागात कांदा लागवडीची (Kanda Lagvad) लगबग असून काही भागात अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी लागवड होऊन काही दिवस उलटून गेल्याने कांदा पीक (Kanda Crop) तरारले आहे. अशा स्थितीत कांदा पिकासाठी कसे व्यवस्थापन करावे, हे समजून घेऊया... 

रांगडा कांद्याचे उभे पीक असतांना ... 

  • सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण ग्रेड-॥ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ६० आणि ७५ दिवसांनी फवारणी करावी. 
  • कांदा पोषणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी फायदेशीर राहते.
  • फुलकिडे (थ्रीप्स) आणि करपा रोगाच्या नियंत्रणाकरिता, कार्बोसल्फान (२५ ईसी) २ मिली अधिक ट्रायसायक्लॅझोल (७५ डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. 
  • इरिओफाईड माइट्सचा प्रादुर्भाव आढळल्यास, गंधक (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम किंवा डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मिली प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
  • बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या कांदा काढणीच्या २० दिवसांपूर्वी बंद कराव्यात.
  • डेंगळे आलेले कांदे दिसल्यास त्वरित काढून टाकावे.
  • पिकाला जमिनीचा मगदूर, तापमान व पिकाची गरज पाहून ८ ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :कांदापीक व्यवस्थापननाशिकलागवड, मशागतशेती