Jamin Taran Karj : कर्जासाठी जमीन तारण म्हणजे कर्जाच्या बदल्यात जमीन सुरक्षित ठेवून कर्ज घेणे. या प्रक्रियेत, कर्जदार बँकेकडे जमिनीची मालकी किंवा हक्क तारण म्हणून देतो आणि त्या बदल्यात त्याला कर्ज मिळते. या प्रक्रियेत नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे पाहुयात...
जमीन संबंधित कागदपत्रांची तपासणी
७/१२ उतारा - जमीन तुमच्या नावावर असल्याचे आणि कोणतेही तंटे किंवा अडचणी नसल्याचे तपासा.
फेरफार नोंद (Mutation Entry) - कोणताही फेरफार झाला असल्यास त्याची नोंद असावी.
प्रॉपर्टी कार्ड किंवा पट्टा जमीन खाजगी आहे का शासकीय याची खात्री करा.
मालकी हक्क पत्र (Title Deed) - म्हणजे जमीन तुमच्या मालकीची असल्याचे स्पष्ट असावे.
बँकेच्या अटी आणि शर्ती व्यवस्थित वाचा
- कर्जावरील व्याजदर, परतफेड कालावधी आणि मासिक हप्त्याची रचना समजून घ्या.
- मुदतपूर्व फेडल्यास कोणतेही शुल्क लागू होणार आहे का याची माहिती घ्या.
- जमीन वादमुक्त असल्याची खात्री करा
- जमीन कोणत्याही कायदेशीर वादात अडकलेली नाही हे सुनिश्चित करा.
- कोणत्याही अन्य व्यक्तीचे हक्क किंवा दावे नाहीत याची खात्री करा.
जमीनाची किंमत आणि मूल्यांकन
बँकेकडून किंवा तज्ञांकडून जमिनीचे योग्य मूल्यांकन करून घ्या.
कमी किंमत दर्शवल्यास कर्जाची रक्कमही कमी होऊ शकते.
जमीन तारण ठेवण्याचे स्वरूप
जमीन संपूर्ण किंवा केवळ काही भाग तारण आहे का हे स्पष्ट करा.
तारण ठेवताना बँकेने किंवा वित्तसंस्थेने कोणत्या अटी घातल्या आहेत हे काळजीपूर्वक वाचा.
कर्ज परतफेड न केल्यास धोके समजून घ्या
कर्ज फेडण्यात अपयश आल्यास जमीन लिलाव किंवा जप्त होण्याची शक्यता लक्षात घ्या.
बँकेशी व्यवहार करताना सर्व अटी आणि शर्ती लेखी स्वरूपात ठेवा.
विमा संरक्षण
जमीन किंवा कर्जावरील विमा घेतल्यास भविष्यात होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळू शकते.
वकील किंवा तज्ञांची मदत घ्या
कागदपत्रे आणि करार तपासण्यासाठी अनुभवी वकील किंवा सल्लागाराची मदत घ्या.
सर्व प्रक्रिया कायदेशीर आहे याची खात्री करा.
