Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > आयसीएआरचा सौर कीटक सापळा, काय आहेत या सोलर ट्रॅपची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर 

आयसीएआरचा सौर कीटक सापळा, काय आहेत या सोलर ट्रॅपची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर 

Latest news ICAR's solar insect trap, what are the features of this solar trap, read in detail | आयसीएआरचा सौर कीटक सापळा, काय आहेत या सोलर ट्रॅपची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर 

आयसीएआरचा सौर कीटक सापळा, काय आहेत या सोलर ट्रॅपची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर 

ICAR's Solar Insect Trap : या समस्येवर उपाय म्हणून, आयसीएआरने हा अनोखा सापळा विकसित केला आहे.

ICAR's Solar Insect Trap : या समस्येवर उपाय म्हणून, आयसीएआरने हा अनोखा सापळा विकसित केला आहे.

ICAR's Solar Insect Trap : शेतकऱ्यांना आता शेतीतील कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. लुधियानामधील आयसीएआर-सीआयपीएचईटीने सौरऊर्जेवर चालणारा एक सार्वत्रिक कीटक सापळा विकसित केला आहे, जो दिवस-रात्र दोन्ही वेळी काम करतो. पिकांवरील कीड पिकांचे मोठे नुकसान करते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. या समस्येवर उपाय म्हणून, आयसीएआरने हा अनोखा सापळा विकसित केला आहे.

हे नवीन तंत्रज्ञान पूर्णपणे पर्यावरणपूरक असून त्याचा वापर शेती तसेच धान्य साठवणुकीसाठी केला जाऊ शकतो. या सापळ्यात चिकट सापळे, फेरोमोन्स, रंगावर आधारित आमिषे आणि पाण्याचे सापळे यांसारख्या अनेक पद्धतींचा वापर करून विविध प्रकारच्या कीटकांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवले जाते.

सोलर ट्रॅपची विशेष वैशिष्ट्ये
या सोलर ट्रॅपचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते २४x७ स्वयंचलितपणे चालते आणि गरजेनुसार त्याची उंची समायोजित करता येते. शेतकरी याचा वापर गोदामांमध्ये तसेच शेतातही करू शकतात.

या तंत्रज्ञानासाठी पेटंट दाखल करण्यात आले आहे. तज्ञांच्या मते, हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी केवळ किफायतशीरच ठरणार नाही, तर पर्यावरण संरक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होईल, जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि पिकांची गुणवत्ता वाढेल.

तुम्ही आतापर्यंत चिकट सापळे आणि फेरोमोन सापळे वापरले असतील, पण या नवीन सापळ्याचे अनेक फायदे आहेत. जसे चिकट सापळे निरुपद्रवी असतात, तसेच नवीन तंत्रज्ञानाचे सापळेही असतात. बहुतेक चिकट सापळ्यांमध्ये कीटकनाशके नसतात, पण काहींमध्ये विशिष्ट कीटकांना आकर्षित करण्यासाठी खास गंध असू शकतो. यामुळे कीटक आकर्षित होतात, आणि मग ते सापळ्यात अडकून मरतात.

सौर ऊर्जेवर चालणारे उपकरण
नवीन सोलर ट्रॅप हे एक असे उपकरण आहे जे सौर ऊर्जेवर चालते आणि दिवस-रात्र स्वयंचलितपणे काम करू शकते. या प्रणालीमध्ये एक सोलर पॅनल, बॅटरी बॉक्स, चिकट सापळे (निळे आणि पिवळे), एक प्रकाश स्रोत, कीटक पकडण्यासाठी पाण्याची भांडी, उंची समायोजित करता येणारी आधार रचना (२ फूट ते ८ फूट) आणि स्वयंचलित स्विचिंगसाठी एक लाईट सेन्सर सर्किट यांचा समावेश आहे.

हे उपकरण वजनाने हलके पण टिकाऊ साहित्यापासून बनवलेले आहे, ज्यामुळे एका व्यक्तीला ते शेतात वाहून नेणे, समायोजित करणे आणि स्थापित करणे सोपे जाते. याला एक स्टँड आहे ज्यामुळे ते जमिनीत स्थिर करता येते आणि घरामध्ये (गोदामांमध्ये) एका मजबूत पृष्ठभागावर ठेवता येते. हा सापळा घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी वापरण्यासाठी योग्य असून, पिकांचे आणि साठवलेल्या धान्याचे नुकसान करणाऱ्या कीटकांना प्रभावीपणे पकडू शकतो.
 

Web Title : आईसीएआर का सौर कीट जाल: किसानों के लिए पर्यावरण-अनुकूल कीट नियंत्रण

Web Summary : आईसीएआर का सौर कीट जाल किसानों को कीटनाशकों का एक पर्यावरण-अनुकूल विकल्प प्रदान करता है। यह 24/7 स्वचालित जाल खेतों और भंडारण में कीटों को नियंत्रित करने, फसल की गुणवत्ता में सुधार करने और रसायनों पर निर्भरता कम करने के लिए कई तरीकों का उपयोग करता है। यह आसानी से पोर्टेबल और समायोज्य है।

Web Title : ICAR Solar Insect Trap: Eco-Friendly Pest Control for Farmers

Web Summary : ICAR's solar insect trap offers farmers an eco-friendly alternative to pesticides. This 24/7 automated trap uses multiple methods to control pests in fields and storage, improving crop quality and reducing reliance on chemicals. It's easily portable and adjustable.