Lokmat Agro >स्मार्ट शेती > बाजरी, मका पिकाची पेरणी कशी आणि किती तारखेपर्यंत कराल? वाचा कृषी सल्ला 

बाजरी, मका पिकाची पेरणी कशी आणि किती तारखेपर्यंत कराल? वाचा कृषी सल्ला 

latest News How and by what date should you sow bajra and maize crops Read agricultural advice | बाजरी, मका पिकाची पेरणी कशी आणि किती तारखेपर्यंत कराल? वाचा कृषी सल्ला 

बाजरी, मका पिकाची पेरणी कशी आणि किती तारखेपर्यंत कराल? वाचा कृषी सल्ला 

Agriculture News : बाजरी आणि मका पिकाची पेरणी कशी करावी आणि किती तारखेपर्यंत करावी, हे समजून घेऊया... 

Agriculture News : बाजरी आणि मका पिकाची पेरणी कशी करावी आणि किती तारखेपर्यंत करावी, हे समजून घेऊया... 

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News :  खरीप हंगामातील (Kharif Season) बाजरी आणि मका पीक पेरणीसाठी शेतकरी तयारी करत आहेत. अधिक उत्पादनासाठी बाजरी आणि मका पिकाची पेरणी कशी करावी आणि किती तारखेपर्यंत करावी, हे समजून घेऊया... 

बाजरी पिकासाठी... 

  • नाशिक जिल्ह्यात (Nashik District) झालेल्या समाधानकारक पाऊस व पावसाचा अंदाज लक्षात घेता शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा देऊन तसेच जीवाणु संवर्धकाची बीज प्रक्रिया करून पिकाच्या अंतरानुसार खरीप हंगामात बाजरीची १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी.
  • खरीप हंगामात पेरणी सरी-वरंबा (थेंब थेंब संचय पद्धत) किंवा सपाट वाफे पद्धतीने करावी. 
  • पेरणी २ ते ३ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये. 
  • पेरणीचे अंतर कोरडवाहू क्षेत्रात दोन ओळीत ४५ सें. मी आणि दोन रोपामध्ये १५ सें.मी. अंतर ठेवावे. 
  • नियमित पावसाच्या ठिकाणी अथवा पाण्याची सोय असेल तेथे ३० x १५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी. 
  • त्याकरिता बियाणे प्रमाण ३-४ किलो प्रती हेक्टरी वापरावे.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. 

मका पिकासाठी.... 

  • नाशिक जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पाऊस व पावसाचा अंदाज लक्षात घेता खरीप हंगामात मक्याची पेरणी १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी.
  • खरीप हंगामात पेरणी सपाट वाफ्यांमध्ये करावी. 
  • पेरणीचे अंतर उशिरा व मध्यम कालावधी असणाऱ्या जातींसाठी ७५ × २० सें.मी तर लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी ६० x २० सें. मी ठेवावे. 
  • पेरणी टोकण पद्धतीने ४ ते ५ सें.मी खोलीवर करावी.
  • अॅट्राटॉप ५० टक्के हेक्टरी २.५ किलो पेरणी संपताच जमिनीवर फवारावे. (पावसाची उघडीप असताना फवारणी करावी)
  • मका पिकाची पेरणी टोकन पद्धतीने करावी त्याकरिता बियाणे प्रमाण १५-२० किलो प्रती हेक्टरी वापरावे.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: latest News How and by what date should you sow bajra and maize crops Read agricultural advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.