Join us

Grape, Kanda Management : ढगाळ वातावरणात द्राक्ष, कांदा पिकाची कशी काळजी घ्याल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:23 IST

Grape, Kanda Management : हवामान बदलामुळे कांदा रोपे खराब होत असून द्राक्ष बागांवर ही परिणाम होऊ आहे.

नाशिक : फेंगल चक्रीवादळामुळे बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात  (Arabi Sea) तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. याशिवाय काही तालुक्यात पावसाच्या (Rain) सरी देखील बरसल्या. हवामान बदलामुळे कांदा रोपे खराब होत असून द्राक्ष बागांवर (Grape, Kanda Management) ही परिणाम होऊ आहे. या दोन्ही पिकांसाठी काय उपाययोजना करता येतील, ते पाहुयात..... 

या पिकांनाही बसणार फटका गहू, हरभरा पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून बदलत्या वातावरणाचा फटका गव्हाला बसणार आहे. तर हरभऱ्याच्या उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे रब्बीचा हंगाम देखील धोक्यात आला आहे. ढगाळ वातावरण नाहीसे होऊन कडाक्याची थंडी रब्बी पिकासाठी गरजेची आहे. 

अशी घ्या काळजी उशिरा फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांत घडकुज व केवडा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन द्राक्ष बागांचे नुकसान होऊ शकते. यात डाऊनी नियंत्रणासाठी २०० लि. पाण्यात मॅडीप्रोपॅमीड २३.४ टक्के एस.सी १६० मिली पी.एच.आय. पाच किंवा पलुओपीकोलाईड फोसेटिल २.२५ २.५ किलो प्रती हेक्टर पी.एच.आय. ४० किंवा सायमोकॉनिल ८ डब्लूपी मॅकोझेब ६४ डब्लूपी ४०० ग्रॅम पी.एच.आय. ६६ किवा अमिटोक्ट्रेंडीन २७ डायमेथोमॉर्फ २०.२७ एससी १६० मिली पी.एच.आय.३४ याप्रमाणे बुरशीनाशकांची बागेच्या अवस्थेनुसार योग्य वेळी फवारणी करावी.

फेगल चक्रीवादळाचा तडाखा जोरात होता त्यामुळे अजून दोन दिवस तरी ढगाळ वातावरण राहू शकते. कांदा, द्राक्ष पिकाला याचा फटका बसेल. कांदा रोपवाटिकेत वाफसा येताच मर रोग नियंत्रणासाठी २५ ते ३० ग्रॅम प्रती १० लिटर याप्रमाणे कॉपर ऑक्सिक्लोराईडची किंवा ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम प्रती १० लिटर या प्रमाणात घेऊन जिरवण करावी.  - हेमराज राजपूत, - कृषी व विज्ञान तज्ज्ञ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

Onion Diseases : कांदा रोपवाटिकेत मर रोग कशामुळे? नियंत्रणासाठी हे उपाय करा, वाचा सविस्तर

टॅग्स :हवामानद्राक्षेकांदापीक व्यवस्थापनपाऊस