Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Grain Protection Tarp Kit Subsidy : शेतमाल ठेवा सुरक्षित; धान्य संरक्षक संच व सोयाबीन चाळणीवर मोठे अनुदान

Grain Protection Tarp Kit Subsidy : शेतमाल ठेवा सुरक्षित; धान्य संरक्षक संच व सोयाबीन चाळणीवर मोठे अनुदान

latest news Grain Protection Tarp Kit Subsidy: Keep farm produce safe; Big subsidy on grain protection kit and soybean screening | Grain Protection Tarp Kit Subsidy : शेतमाल ठेवा सुरक्षित; धान्य संरक्षक संच व सोयाबीन चाळणीवर मोठे अनुदान

Grain Protection Tarp Kit Subsidy : शेतमाल ठेवा सुरक्षित; धान्य संरक्षक संच व सोयाबीन चाळणीवर मोठे अनुदान

Grain Protection Tarp Kit Subsidy : पावसाच्या हंगामात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काढणी केलेले धान्य भिजून खराब होणे. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर धान्य संरक्षक सॅक ताडपत्री संच आणि सोयाबीन चाळणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. वाचा सविस्तर (Grain Protection Tarp Kit Subsidy)

Grain Protection Tarp Kit Subsidy : पावसाच्या हंगामात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काढणी केलेले धान्य भिजून खराब होणे. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर धान्य संरक्षक सॅक ताडपत्री संच आणि सोयाबीन चाळणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. वाचा सविस्तर (Grain Protection Tarp Kit Subsidy)

शेअर :

Join us
Join usNext

Grain Protection Tarp Kit Subsidy : पावसाच्या हंगामात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काढणी केलेले धान्य भिजून खराब होणे. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. (Grain Protection Tarp Kit Subsidy)

वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर धान्य संरक्षक सॅक ताडपत्री संच आणि सोयाबीन चाळणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.(Grain Protection Tarp Kit Subsidy)

१६ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज प्रक्रिया सुरू असून, 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे नुकसान टाळता यावे आणि पावसामुळे धान्य भिजू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नवी योजना सुरू केली आहे. 

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर धान्य संरक्षक सॅक-ताडपत्री संच आणि सोयाबीन चाळणी (स्पायरल सेपरेटर) देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी १६ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत संबंधित पंचायत समितीच्या कृषी अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी अभिजित देवगीरकर यांनी केले आहे.

धान्य संरक्षक सॅक ताडपत्री संच म्हणजे काय?

गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन काढणीच्या काळात अचानक पावसामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने यंदा प्रथमच 'धान्य संरक्षक सॅक ताडपत्री संच योजना' राबविली आहे.

या संचामध्ये काय असेल?

या संचामध्ये वरून आणि खालून असे दोन थर असलेले ताडपत्री कव्हर असतात,

वेलक्रो सीलिंगची सोय असून चारही बाजूने ल्याशिंग बेल्ट दिलेले आहेत,

त्यामुळे कितीही पाऊस आला तरी सोयाबीन किंवा इतर धान्य पूर्णपणे सुरक्षित राहते.

या संचावर शासनाकडून ७५ टक्के अनुदान मिळणार आहे. मात्र, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच अनुदान मिळेल. इतर ताडपत्र्यांना अनुदान मिळणार नाही.

सोयाबीन चाळणी योजना (Spiral Separator)

सोयाबीन उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी स्पायरल सेपरेटर (चाळणी यंत्र) योजनेचाही समावेश आहे. ही यंत्रणा सोयाबीनची निवड करून त्यातील दाणे वगळते, ज्यामुळे शुद्ध व दर्जेदार उत्पादन बाजारात देता येते.

तालुकानिहाय लक्ष्यांक (Target allocation)

धान्य संरक्षक सॅक ताडपत्री संचासाठी लक्ष्यांक

कारंजा – २१

मानोरा – २०

मंगरूळपीर – २०

मालेगाव – २१

रिसोड – २१

वाशिम – २१

सोयाबीन चाळणी (स्पायरल सेपरेटर) साठी लक्ष्यांक

कारंजा – ३६

मानोरा – ३६

मंगरूळपीर – ३६

मालेगाव – ३६

रिसोड – ३६

वाशिम – ३५

या दोन्ही योजनांचा लाभ 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य'; या तत्त्वावर दिला जाणार असून, शासन निकषांनुसार लाभार्थी निवड केली जाईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.

७/१२ उतारा (जमिनीचा पुरावा)

८-अ उतारा (एकूण क्षेत्रफळासाठी)

आधारकार्ड

शिधापत्रिका

मोबाईल क्रमांक

मागासवर्गीय / दिव्यांग / आत्महत्याग्रस्त कुटुंब असल्यास संबंधित प्रमाणपत्र

आधार लिंक बँक पासबुकची झेरॉक्स

कृषी विभागाच्या या योजनेमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान्य साठवणुकीची आधुनिक सुविधा मिळणार आहे. पावसामुळे होणारे नुकसान टाळून शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी हा उपाय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

शेतकऱ्यांनी धान्य संरक्षक सॅक ताडपत्री संच आणि सोयाबीन चाळणी योजनेचा लाभ घ्यावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबर आहे. ही योजना शेतकऱ्यांना पावसापासून संरक्षण व उत्पादनाचे शाश्वत रक्षण देईल. - अभिजित देवगीरकर, कृषी विकास अधिकारी

हे ही वाचा सविस्तर : Mahadbt Scheme : ट्रॅक्टरपासून ठिबकपर्यंत; 'या' जिल्ह्यातील महाडीबीटी योजनांचा मोठा फायदा!

Web Title : किसानों को अनाज सुरक्षा तिरपाल बोरी पर 75% सब्सिडी!

Web Summary : वाशिम जिला परिषद अनाज सुरक्षा बोरी और सोयाबीन विभाजक पर 75% सब्सिडी प्रदान करता है। आवश्यक दस्तावेजों के साथ 27 अक्टूबर तक आवेदन करें। पहले आओ, पहले पाओ के आधार पर, डीबीटी विधि, लक्ष्य भिन्न हो सकते हैं। विशेष बोरे कटाई की गई सोयाबीन को बारिश से बचाते हैं।

Web Title : Farmers get 75% subsidy on grain protection tarpaulin sacks!

Web Summary : Washim Zilla Parishad offers 75% subsidy on grain protection sacks and soybean separators. Apply by October 27th with required documents. First-come, first-served basis, DBT method, targets may vary. Special sacks protect harvested soybean from rain damage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.