Agriculture News : वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये भुरीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उत्पादनाचा दर्जा घटण्यासोबतच उत्पन्नामध्येही घट येते. प्रतिबंधात्मक उपाययोजना हीच भुरी नियंत्रणाची सर्वांत योग्य पद्धत आहे. एकदा आलेली भुरी नियंत्रित करण्यास अवघड असते. यासाठी वेलींचे सतत निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.
व्यवस्थापन
रोग प्रतिबंधक जातींची लागवड करावी.
नत्र अन्नद्रव्याच्या अति वापराने भुरीची तीव्रता वाढते. तर पालाश अन्नद्रव्यामुळे पिकाची आंतरिक रोग प्रतिकारक्षमता वाढून, रोगाची तीव्रता कमी होते.
यासाठी अन्नद्रव्यांचा संतुलित मात्रेत वापर करावा.
दाटीवाटीने वाढलेल्या पिकामध्ये रोग प्रसारासाठी अनुकूल सूक्ष्म हवामान बनते व रोगाची तीव्रता वाढते.
यासाठी पिकाच्या ओळींमध्ये हवा खेळती राहील, अशाप्रकारे रोपांची संख्या ठेवावी.
भुरी रोगाच्या प्रतिबंधासाठी हवामानानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने, मेप्टिलडीनोकॅप (३७.५ ईसी) ०.७मि.ली. किंवा हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) १ मि.ली. किंवा डायफेनोकोनॅझोल (२५ ईसी) ०.५ मि.ली. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
भाजीपाला पिकांवरील फुलकिडींचे नियंत्रणासाठी फिप्रोनिल १५ मिली प्रति १० लि पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
रोपवाटीकेतील वांगी, मिरची, टमाटे इ. भाजीपाला रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रती वाफा ५० ग्रॅम युरिया खताची मात्रा द्यावी. भाजीपाला रोपे पुनर्लागवड करावयाच्या शेतामध्ये जमीन वाफसा स्थितीत असताना मशागतीचे कामे सुरु करावीत.
उन्हाळी कांद्याच्या लागवडीसाठी गादी वाफे करुन रोपे तयार करण्यासाठी बियाणे पेरणी करावी व उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेल्या सुधारित जातीचा वापर करावा.
तसेच पेरणी पुर्वी ॲझोस्पिरिलम + पीएसबी (PSB) या जिवाणु संवर्धनाचा वापर करावा.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
