Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू

Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू

latest news Gas Booking New Rule: Didn't buy cylinder within 10 days? Booking will be cancelled! New rule implemented | Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू

Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू

Gas Booking New Rule : ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना. गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर वेळेत डिलिव्हरी न घेतल्यास तुमचे बुकिंग रद्द होऊ शकते. वितरण व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.(Gas Booking New Rule)

Gas Booking New Rule : ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना. गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर वेळेत डिलिव्हरी न घेतल्यास तुमचे बुकिंग रद्द होऊ शकते. वितरण व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.(Gas Booking New Rule)

Gas Booking New Rule : घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात निर्माण होणारा अनावश्यक ताण कमी करण्यासाठी गॅस एजन्सींनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(Gas Booking New Rule)

आता ग्राहकाने सिलिंडर बुक केल्यानंतर दहा दिवसांच्या आत डिलिव्हरी स्वीकारली नाही, तर संबंधित बुकिंग थेट रद्द करण्यात येणार आहे.(Gas Booking New Rule)

राज्यातील अनेक ठिकाणी या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून, 'पॅनिक बुकिंग'मुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर नियंत्रण आणण्याचा उद्देश आहे.(Gas Booking New Rule)

का घेतला हा निर्णय?

अलीकडच्या काळात सिलिंडरचा तुटवडा होईल या भीतीने अनेक ग्राहक गरजेपेक्षा आधीच बुकिंग करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे वितरण साखळीवर अतिरिक्त ताण येत होता.

गरज नसतानाही आगाऊ बुकिंग वाढले

डिलिव्हरीवेळी ग्राहक घरी नसणे किंवा सिलिंडर नाकारणे

खऱ्या गरजूंना प्रतीक्षा करावी लागणे

वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होणे

या पार्श्वभूमीवर एजन्सींनी जुन्या नियमाची पुन्हा कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.

ग्राहकांसाठी महत्त्वाचे नियम

बुकिंग वैधता : सिलिंडर बुकिंग फक्त १० दिवसांसाठीच वैध असेल

बुकिंग रद्द : १० दिवसांत डिलिव्हरी न घेतल्यास बुकिंग आपोआप रद्द होईल

पुन्हा प्रक्रिया : रद्द झाल्यानंतर ग्राहकाला नव्याने बुकिंग करावे लागेल

एजन्सीचा उशीर असल्यास सूट : पुरवठा उशिरा झाल्यास ग्राहकावर कारवाई होणार नाही

'पॅनिक बुकिंग'मुळे वाढलेला ताण

गॅस एजन्सींच्या माहितीनुसार, पूर्वी दररोज सुमारे १,००० बुकिंग होत होती. मात्र, भीतीपोटी हा आकडा ३,५०० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे डिलिव्हरी यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला होता.

ग्राहकांनी डिलिव्हरी टाळल्यामुळे सिलिंडर परत आणावे लागतात. त्यामुळे १० दिवसांची मर्यादा ठेवून बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.- सौरभ केदारे, एजन्सी मालक

सध्या गॅसचा पुरवठा नियमित आहे. ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच बुकिंग करावे.- मंगेश आसवार, एजन्सी मालक

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

* गरज असल्यासच सिलिंडर बुक करा

* डिलिव्हरीवेळी घरात उपस्थित राहा

* ऑनलाइन किंवा रोख पेमेंट तयार ठेवा

* पत्ता व मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवा

गॅस सिलिंडरचा तुटवडा नसतानाही भीतीपोटी होणाऱ्या 'पॅनिक बुकिंग'मुळे वितरण व्यवस्थेवर ताण येत होता. 

आता १० दिवसांच्या नियमामुळे अनावश्यक बुकिंगला आळा बसून गरजू ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण

अधिक वाचा : Natural Farming : शेतीत मोठा बदल; नागपुरात 'नैसर्गिक शेती'ची पायाभरणी वेगात

Web Title : गैस सिलेंडर बुकिंग नियम बदला: 10 दिनों के बाद बुकिंग रद्द!

Web Summary : गैस सिलेंडर बुकिंग का नया नियम: 10 दिनों के भीतर डिलीवरी नहीं लेने पर बुकिंग रद्द हो जाएगी। पैनिक बुकिंग के कारण दबाव बढ़ गया था, जिससे जरूरतमंदों के लिए समय पर डिलीवरी सुनिश्चित करने और अनावश्यक बोझ को कम करने के लिए यह सख्त नियम लागू किया गया है।

Web Title : Gas Cylinder Booking Rule Change: Bookings Cancelled After 10 Days!

Web Summary : New gas cylinder booking rule: Bookings get cancelled if delivery isn't taken within 10 days. Panic booking caused strain, leading to this stricter rule to ensure timely delivery for those in need and reduce unnecessary burden.