Lokmat Agro >स्मार्ट शेती > मोसंबी व संत्रा फळगळ थांबविण्यासाठी 'हे' उपाय हमखास करा, वाचा सविस्तर 

मोसंबी व संत्रा फळगळ थांबविण्यासाठी 'हे' उपाय हमखास करा, वाचा सविस्तर 

Latest News Follow these remedies to stop rotting of citrus fruits and oranges, read in detail | मोसंबी व संत्रा फळगळ थांबविण्यासाठी 'हे' उपाय हमखास करा, वाचा सविस्तर 

मोसंबी व संत्रा फळगळ थांबविण्यासाठी 'हे' उपाय हमखास करा, वाचा सविस्तर 

Agriculture News :

Agriculture News :

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News :  संत्रा आणि मोसंबी फळगळ व्यवस्थापनासाठी (Orange and Citrus Fruit Management) फळबागेतील पाण्याची व्यवस्था, खत व्यवस्थापन, आणि कीड-रोग नियंत्रण यावर लक्ष देणे आवश्यक आहे. फळगळ थांबवण्यासाठी काही उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत, त्या समजून घेऊयात... 

संत्रा आणि मोसंबी फळगळ व्यवस्थापनासाठी 

  • वाफ्याने पाणी देताना खोडाजवळ पाणी साचणार नाही ही काळजी घ्यावी
  • गळलेली फळे बागे बाहेर उचलून टाकावीत.
  • फळगळ व्यवस्थापनाकरिता पहिली फवारणी एन.ए.ए (१० पी.पी.एम) एक ग्रॅम किंवा जिबरेलिक ॲसिड (१५ पी.पी.एम) दीड ग्रॅम अधिक एक किलो युरिया प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
  • दुसरी फवारणी एन.ए.ए (१० पीपीएम) एक ग्रॅम किंवा जिबरेलिक ॲसिड (१५ पी.पी.एम) दीड ग्रॅम अधिक ब्रोसिनोलॉईड Brocinoloid (४ पी.पी.एम) ०.४ ग्रॅम अधिक फॉलिक ॲसिड (१०० पी.पी.एम) दहा ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  • झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करताना, झाडांवर पानांची संख्या कमी असल्यास, पाने पिवळट हिरव्या रंगाची असल्यास कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट १ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • बुरशीजन्य फळगळीच्या नियंत्रणासाठी ०.६ टक्का बोडों मिश्रण किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन अधिक डायफेनकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Follow these remedies to stop rotting of citrus fruits and oranges, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.