Lokmat Agro >स्मार्ट शेती > Farmer id Correction : फार्मर आयडीमध्ये ऑनलाईन दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर 

Farmer id Correction : फार्मर आयडीमध्ये ऑनलाईन दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Farmer id correction How to make correction in Farmer ID online Know in detail | Farmer id Correction : फार्मर आयडीमध्ये ऑनलाईन दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर 

Farmer id Correction : फार्मर आयडीमध्ये ऑनलाईन दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर 

Farmer id Correction : Agristack या पोर्टलवर (Agristack Portal) आता शेतकऱ्यांना स्वतःचा मोबाईल नंबरसह इतर माहिती अपडेट करता येणार आहे.

Farmer id Correction : Agristack या पोर्टलवर (Agristack Portal) आता शेतकऱ्यांना स्वतःचा मोबाईल नंबरसह इतर माहिती अपडेट करता येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Farmer id Correction :  फार्मर युनिक आयडी (Farmer Unique ID) काढण्यासाठी अनेक शेतकरी सध्या Agristack या पोर्टलवर नोंदणी करत आहेत. याच पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या पोर्टलवर दिलेला आपला मोबाईल नंबर कसा बदलायचा? याची नोंदणी करत असताना एकच गट समाविष्ट केला असल्यास दुसरा गट समाविष्ट कसा करायचा? असे अनेक प्रकारचे प्रश्न होते. 

परंतु यावर दुरुस्तीचा पर्याय देण्यात आलेला नव्हता. अखेर या पोर्टलवर (Agristack Portal) आता शेतकऱ्यांना स्वतःचा मोबाईल नंबरसह इतर माहिती अपडेट करता येणार आहे. म्हणजेच दुरुस्तीची सोय करण्यात आलेली आहे. 

नोंदणीची स्थिती पहा... 

  • सर्वप्रथम ॲग्रीस्टॅकच्या https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ वेबसाईटवर यायचा आहे. 
  • या पोर्टल वर आल्यानंतर डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस लॉगिन विथ सीएससी अशा प्रकारचे पर्याय दाखवण्यात आलेले आहेत. 
  • याचबरोबर फार्मर लॉगिन साठी देखील पर्याय दिसून येईल. 
  • यात फार्मरवर क्लिक करून मोबाईल नंबर ओटीपी किंवा मोबाईल नंबर पासवर्डनुसार लॉगिन करू शकता. 
  • लॉगिन केल्यानंतर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली माहिती दिसून येईल. यात आपले नाव, पत्ता, वय अशी सर्व माहिती दाखवली जाईल. 
  • याच ठिकाणी चेक एनरोलमेंट स्टेटस नावाचा एक पर्याय दिसून येईल. 
  • यानुसार आपल्या नोंदणीची सध्याची स्थिती काय आहे हे लक्षात येईल.
  • यामध्ये आपल्याला जर एनरोलमेंट आयडी आलेला असेल किंवा सेंट्रल आयडी आला असेल तर तो आपल्याला दाखवला जाईल. 

 

माहिती अपडेट कशी कराल? 

  • तसेच अपडेट माय इन्फॉर्मेशन असा पर्याय दाखवला जाईल. 
  • त्यावर क्लिक करून सर्वप्रथम आपल्या केवायसी चे डिटेल्स मध्ये मोबाईल नंबर बदलू शकतो. 
  • यासाठी जुना मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तो नंबर व्हेरिफाय करायचा आहे. 
  • नवीन जो नंबर द्यायचा आहे तो नवीन नंबर टाकून त्यावर देखील एक ओटीपी पाठवला जाईल, तो टीव्ही पुन्हा प्रविष्ट करायचा आहे. 
  • हे ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर यामध्ये नवीन नंबर आपण समाविष्ट करू शकतो. 
  • यानंतर आपल्याला जमिनीच्या संदर्भात काही अतिरिक्त माहिती समाविष्ट करायची असल्यास ती देखील करता येणार आहे. 
  • यासाठी द न्यू लँड या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • यावर जमिनी संदर्भातील माहिती भरू शकता. 
  • सद्यस्थितीत केवळ नवीन जमीन समाविष्ट करणे आणि जमिनीची माहिती दुरुस्त करणे हे दोन्ही पर्याय आपल्याला अपडेट माय इन्फॉर्मेशन अंतर्गत करता येणार आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला केवायसीमध्ये काही बदल करायचे असेल ते सुद्धा आपल्याला या पर्यायांमध्ये दाखवले जात आहे.
     

Web Title: Latest News Farmer id correction How to make correction in Farmer ID online Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.