Varah Palan Yojana : राज्यात "मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना (राज्यस्तरीय योजना)" लागू करण्यात आली आहे. सदर योजनेत वराह पालनास प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपयोजनेचा समावेश “मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेमध्ये करण्यात आला आहे.
वराह पालन गट वाटप योजना प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास उपयोजनेचा समावेश करण्यात येत असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे -
लाभाचे स्वरुप - ५+१ वराह गट + विमा
लाभार्थी - सर्व प्रवर्गातील दारिद्रय रेषेखालील, भुमीहीन, अत्यल्प भुधारक, अल्प भुधारक, सुशिक्षीत बेरोजगार, महिला बचत गट
लाभार्थी निकष
सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
अ) भुमीहीन
ब) अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत भूधारक)
क) अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंत भूधारक)
ड) वनहक्क धारक
इ) महिला बचत गटातील लाभार्थी
वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के तसेच महिलांना ५० टक्के आरक्षण लागू राहील.
पात्रता
पशुपालन व्यवसायाचे शासकीय / निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण (अर्ज करतांना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापुर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील)
गटाची किंमत
५+१ वराह गट वाटप
१) पशुधन खरेदी :
- अ) प्रति मादी वराह - २२ हजार ५०० रुपये
- ब) नर वराह - २५ हजार रुपये
२) विमा - १२.७५ टक्के (३ वर्षासाठी)- १७ हजार ५३१ रुपये ३) विक्री कर - १८ टक्के - ३ हजार १५६ रुपये
एकूण - १ लाख ५८ हजार १८७ रुपये
२. शेड, खाद्य, पाणी उपकरणे व साहित्य (शेड वॉशर / स्प्रे पंप) - ५० हजार रुपये
अशी एकूण प्रकल्प किंमत २ लाख ८ हजार १८७ रुपये
अनुदानाचे स्वरुप
- सर्वसाधारण लाभार्थी - ५० टक्के
- अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी - ७५ टक्के
आवश्यक कागदपत्रे
- पशुपालन व्यवसायाचे शासकीय/निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (अर्ज करतांना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापुर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमी पत्र.)
- किंवा
- स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे २ वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र
- दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
- शेडसाठी जागा उपलब्ध असल्याचे तसेच वराह मोकाट सोडले जाणार नाही, याबाबतचे स्वयंघोषणा पत्र.
अटी आणि शर्तींसह संपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी इथे क्लिक करा
