E Pik Pahani : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी अॅपच्या मदतीने शेतकरी त्यांच्या जमिनीची नोंदणी करू शकतात. यामध्ये कायम पड आणि चालू पड जमिनीचीही माहिती भरता येते. ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप मधून कायम पड/ चालू पड नोंदविण्याची प्रक्रिया समजून घेऊयात....
सर्वात आधी कायम पड आणि चालू पड जमीन म्हणजे काय?
कायम पड जमीन : दीर्घकाळ (साधारणपणे 5 वर्षांपेक्षा जास्त) शेतीसाठी वापरात नसलेली जमीन.
चालू पड जमीन : मागील 1-2 हंगामांपासून शेतीसाठी वापरात नसलेली पण भविष्यात शेतीसाठी वापरली जाण्याची शक्यता असलेली जमीन.
जर तुमच्या मोबाईल ई पीक पाहणीचे ॲप डाऊनलोड केलेले असेल त्यानंतरची ही प्रक्रिया....
- सर्वप्रथम कायम पड/चालू पड नोंदवा.
- यानंतर नोंदवण्याचा दिनांक आपोआप दिसेल.
- खाते क्रमांक निवडा.
- यानंतर गट क्रमांक निवडा.
- पुढील विंडोमध्ये कायम पड/चालू पड प्रकार निवडा पड निवडा.
- कायम पड चालू पड जमीन क्षेत्र म्हणजेच (हेक्टर. आर)
- (कायम पड क्षेत्र हे प्रतिकृषी वर्षात प्रत्येक सर्वे नंबरसाठी एकदाच नोंदवता येईल. तसेच नोंदवलेली माहिती चुकीची असल्यास ती अद्यावत करता येईल)
- त्यानंतर माहितीची पुष्टी करा.
- स्वयंघोषणा पत्रावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- (तुम्ही जर नेटवर्कमध्ये नसाल तर ती माहिती साठवली जाईल आणि नेटवर्कमध्ये आल्यानंतर पुन्हा होमपेज वरील अपलोड बटनावर क्लिक करून माहिती अपलोड करावी.)