Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान, अर्जासोबत ही कागदपत्रे लागतील? 

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान, अर्जासोबत ही कागदपत्रे लागतील? 

Latest news Documents for tractor subsidy under Agricultural Mechanization Scheme see full List | कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान, अर्जासोबत ही कागदपत्रे लागतील? 

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान, अर्जासोबत ही कागदपत्रे लागतील? 

Tractor Scheme Documents : जर या योजनेंतर्गत ट्रॅक्टर घ्यावयाचा असल्यास कोणती कागदपत्रे लागतील, हे पाहूयात... 

Tractor Scheme Documents : जर या योजनेंतर्गत ट्रॅक्टर घ्यावयाचा असल्यास कोणती कागदपत्रे लागतील, हे पाहूयात... 

Tractor Scheme Documents : महाडीबीटीच्या माध्यमातून राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत ट्रॅक्टरपासून तर वेगवेगळ्या यंत्रापर्यंत लाभ दिला जातो. तुम्हाला जर या योजनेंतर्गत ट्रॅक्टर घ्यावयाचा असल्यास कोणती कागदपत्रे लागतील, हे आजच्या लेखातून समजून घेऊयात... 

पात्रता काय आहे? 

  •  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  •  शेतकरी अनु. जाती, अनु.जमातीमधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील, म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही, परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. 
  • उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील. 

आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  • Farmer ID
  •  ७/१२ उतारा
  •  ८ अ दाखला
  •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  •  जातीचा दाखला (अनु. जाती व अनु. जमातीसाठी )
  •  स्वयं घोषणापत्र
  •  पूर्वसंमती पत्र

 

अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी साहाय्यक यांची भेट घ्या. 

Web Title : ट्रैक्टर सब्सिडी योजना: आवेदन के लिए आवश्यक दस्तावेज

Web Summary : कृषि यांत्रिकीकरण योजना के तहत ट्रैक्टर खरीदने पर सब्सिडी पाएं! किसानों को आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 ए, जाति प्रमाण पत्र (यदि लागू हो), कोटेशन, निरीक्षण रिपोर्ट, स्व-घोषणा और पूर्व-सहमति पत्र की आवश्यकता है। विस्तृत जानकारी के लिए अपने स्थानीय कृषि सहायक से मिलें।

Web Title : Tractor Subsidy Scheme: Documents Required for Application Explained

Web Summary : Get subsidy for tractor purchase under Krishi Yantrikikaran Yojana! Farmers need Aadhar card, 7/12 extract, 8A, caste certificate (if applicable), quotation, inspection report, self-declaration and pre-consent letter. Visit your local Krishi Sahayak for detailed information.