Lokmat Agro >स्मार्ट शेती > कांद्याचे चांगले रोप तयार होण्यासाठी रोपवाटिकेत 'या' गोष्टी करा, वाचा सविस्तर 

कांद्याचे चांगले रोप तयार होण्यासाठी रोपवाटिकेत 'या' गोष्टी करा, वाचा सविस्तर 

Latest News Do these things in the nursery to get good onion seedlings, read in detail | कांद्याचे चांगले रोप तयार होण्यासाठी रोपवाटिकेत 'या' गोष्टी करा, वाचा सविस्तर 

कांद्याचे चांगले रोप तयार होण्यासाठी रोपवाटिकेत 'या' गोष्टी करा, वाचा सविस्तर 

Kanda Ropvatika : अनेक शेतकरी रोपवाटिका तयार करण्यात व्यस्त आहेत. सक्षम रोपवाटिका तयार केली तर उत्पादन देखील चांगले होते.

Kanda Ropvatika : अनेक शेतकरी रोपवाटिका तयार करण्यात व्यस्त आहेत. सक्षम रोपवाटिका तयार केली तर उत्पादन देखील चांगले होते.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Ropvatika :  खरिपातील कांदा लागवडीसाठी रोपवाटिका (Kanda Ropvatika) तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. अनेक शेतकरी रोपवाटिका (Onion Nursery) तयार करण्यात व्यस्त आहेत. सक्षम रोपवाटिका  तयार केली तर उत्पादन देखील चांगले होते. म्हणून रोपवाटिका व्यवस्थापन करताना काय काळजी घेतली पाहिजे, हे पाहुयात.... 

कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

  • एक एकर कांदा लागवडीसाठी २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. 
  • एक एकर लागवडीसाठी २-३ किलो बी पुरेसे होते. 
  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम कार्बेन्डाझीम हे बुरशीनाशक चोळावे. 
  • पेरणीपूर्वी २०० किलो शेणखतासोबत ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हीरिडी वापरून जमिनीत मिसळावे. 
  • रोपवाटिकेस सुरुवातीला झारीने पाणी द्यावे, नंतर पाटपाणी दिले तरी चालू शकते. 
  • रोपवाटिकेत ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती वापरण्यासाठी जमिनीपासून १०-१५ सें.मी. उंच, १-१२ मीटर रुंद आणि गरजेनुसार लांब गादीवाफे जमिनीच्या उताराला आडवे तयार करावेत. 
  • त्यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते. पाणी फार काळ साचून राहत नाही, त्यामुळे रोपे कुजत किंवा सडत नाहीत. 
  • तसेच लावणीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात. 
  • वाफे तयार करताना १६०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम पालाश प्रति २०० वर्ग मीटर याप्रमाणात खते द्यावीत, रुंदीशी समांतर ५-७.५ से. मी. अंतरावर रेघा पाडून १-१.५ सें. मी. खोलीवर बियाणे पेरावे. 
  • पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. 
  • नंतर झारीने जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पध्दतीने पाणी द्यावे, तण नियंत्रणासाठी रोपे उगण्यापुर्वी वाफ्यावर पेंडीमिथैलीन २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
  • पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करून, ८०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर या प्रमाणात नत्र द्यावे.


- ग्रामीण मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Do these things in the nursery to get good onion seedlings, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.