Lokmat Agro >स्मार्ट शेती > लिंबूवर्गीय फळपिकावरील डिंक्या रोगाचा झटक्यात नायनाट कसा करायचा, वाचा सविस्तर 

लिंबूवर्गीय फळपिकावरील डिंक्या रोगाचा झटक्यात नायनाट कसा करायचा, वाचा सविस्तर 

latest News Dinkya Disease How to eradicate disease of citrus fruit read in detail | लिंबूवर्गीय फळपिकावरील डिंक्या रोगाचा झटक्यात नायनाट कसा करायचा, वाचा सविस्तर 

लिंबूवर्गीय फळपिकावरील डिंक्या रोगाचा झटक्यात नायनाट कसा करायचा, वाचा सविस्तर 

Dinkya Disease : हा एक बुरशीजन्य रोग आहे, ज्यामध्ये झाडाच्या खोडाला इजा होऊन त्यातून डिंकासारखा चिकट पदार्थ बाहेर येतो.

Dinkya Disease : हा एक बुरशीजन्य रोग आहे, ज्यामध्ये झाडाच्या खोडाला इजा होऊन त्यातून डिंकासारखा चिकट पदार्थ बाहेर येतो.

शेअर :

Join us
Join usNext

 Dinkya Disease :   'डिंक्या' हा लिंबूवर्गीय झाडांवर (संत्रा, मोसंबी, लिंबू) येणारा एक बुरशीजन्य रोग आहे, ज्यामध्ये झाडाच्या खोडाला इजा होऊन त्यातून डिंकासारखा चिकट पदार्थ बाहेर येतो. या रोगाचे नियंत्रण नेमके कसे करावे, हे पाहुयात.... 

लिंबूवर्गीय फळपिकावरील डिंक्याचे व्यवस्थापन

  • रोगप्रतीकारक खुंटाचा वापर करावा.
  • पावसाळ्यात झाडांच्या बुंध्याभोवती पाणी साचू देऊ नये.
  • लागवड नेहमी चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत करावी. रोगग्रस्त फांद्या छाटून जाळाव्यात.
  • सतत पाण्याचा संपर्क झाडाच्या बुंध्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या, चिंबाड, चिकन माती, दलदलीची जमिन इत्यादी मध्ये लागवड कुरूनये.
  • डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच मेटॅलॅक्झीकल २.५ ग्रॅम किंवा मेफीनो २.५ ग्रॅम किंवा फोसाटाईल-ए एल २.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात द्रावणे तयार करून फवारणी करावी.
  • गरजेनुसार पावसाळ्यामध्ये या बुरशीनाशकांच्या आलटून पालटून १२ ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात,
  • प्रतिवर्षी पावसाळ्यापुर्वी व पावसाळ्यानंतर दोन वेळा बोर्डपिस्ट १ टक्का (१ किलो मोरचूद + १ किलो कळीचा चुना १० लिटर पाणी) तयार करून सर्व झाडाच्या खोडावर जमिनीपासून ३ ते ४ फुट उंचीपर्यंत लावावेत. बोर्डपिस्ट लावण्यापुर्वी रोगग्रस्त फांद्या, खोडावरील तडकलेलों साल, डिंक इत्यादी काढून खोड स्वच्छ करावे.
  • तसेच पावसाळ्यामध्ये किमान २ ते ३ वेळा १% बोर्डो मिश्रणाची (१ किलो मोरचुद + १ किलो कळीचा चुना + १०० लिटर पाणी) फवारणी करावी.

 

- फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप), किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी

Web Title: latest News Dinkya Disease How to eradicate disease of citrus fruit read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.