Lokmat Agro >स्मार्ट शेती > Dalimb Farming : डाळिंबावर सूत्रकृमीचा प्रादुर्भाव झाल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

Dalimb Farming : डाळिंबावर सूत्रकृमीचा प्रादुर्भाव झाल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

Latest News Dalimb Crop Management pomegranate is infected with nematodes Read in detail | Dalimb Farming : डाळिंबावर सूत्रकृमीचा प्रादुर्भाव झाल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

Dalimb Farming : डाळिंबावर सूत्रकृमीचा प्रादुर्भाव झाल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

Dalimb Farming : डाळिंबावरील सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब करावा.

Dalimb Farming : डाळिंबावरील सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब करावा.

शेअर :

Join us
Join usNext

Dalimb Farming :  डाळिंबावर (Pomegranate) सूत्रकृमी (नॅमॅटोड) चा प्रादुर्भाव (Nametod) झाल्यास झाडाच्या मुळांवर गाठी येतात आणि झाड अशक्त होते, ज्यामुळे फुलधारणा कमी होते. सूत्रकृमीचे नियंत्रण करण्यासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे. 

  • सूत्रकृमींचा अधिक प्रादुर्भाव हा झाडाच्या ड्रिपरच्या खाली असलेल्या पांढऱ्या किंवा नवीन मुळांवरील गाठींवरून स्पष्ट होतो. 
  • सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास विश्रांती काळात किंवा बहर नियमनाच्या वेळी सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब करावा.
  • प्रत्येक ड्रीपर खाली ५ ते १० सें.मी. खोल खड्डा करून त्यामध्ये फ्लूएनसल्फोन (२ जीआर) १० ग्रॅम टाकून मातीने झाकून टाकावे. 
  • फ्लूएनसल्फोनची मात्रा जास्तीत जास्त ४० ग्रॅम प्रति झाड इतकी वापरावी. त्यानंतर हलके पाणी द्यावे किंवा
  • फ्लूओपायरम (३४.४८ एससी) २ मि.ली. प्रति झाड या प्रमाणे ट्रेंचिंग करावे. 
  • ट्रेंचिंग करण्यापूर्वी झाडांना पुरेसे पाणी द्यावे. 
  • प्रत्येक झाडासाठी २ लिटर पाण्यामध्ये २ मि.ली. फ्लूओपायरम हे द्रावण ५०० मि.ली. प्रति ड्रिपर (जर एका झाडाला चार ड्रिपर असतील) किंवा १००० मि.ली. प्रति ड्रिपर (जर एका झाडाला दोन ड्रिपर असतील) मिसळून ट्रेंचिंग करावे.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Dalimb Crop Management pomegranate is infected with nematodes Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.