Dalimb Bag : डाळिंबातील हस्त बहार (सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फुलं येणारा बहार) घेण्यासाठी झाडावर ताण आणणे, छाटणी करणे आणि योग्य खतपाणी व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. या काळात कसे व्यवस्थापन करावे, हे जाणून घेऊयात...
डाळिंब हस्त बहार नियोजन (सप्टेंबर-ऑक्टोबर पीक नियमन)
बागेची अवस्था : (ताण सोडणे आणि बहार नियमन)
बागेची मशागत
- पाऊस/ पावसाळा संपल्यानंतर, २०-२५ दिवसंपर्यंत पाणी देऊ नये.
- खतांची मात्रा देताना फळबागेतील पडलेली पाने.
- काडीकचरा काढून टाकावा अथवा जमिनीत पुरून टाकावा.
- बागेतील झाडांना बसलेल्या ताणाच्या तीव्रतेनुसार इथेफॉनचा वापर करून पानगळ करावी.
- बेमोसमी पाऊस किंवा अन्य कारणांमुळे झाडांना योग्य ताण बसला नसल्यास, इथेफॉनच्या (३९ एसएल) दोन फवारण्या घ्याव्यात.
- पहिली फवारणी ०.९ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे व दुसरी इथेफॉनची फवारणी ५ ते ८ दिवसांनी पानांच्या पिवळेपणानुसार १ ते १.५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे घ्यावी.
- प्रत्येक इथेफॉन फवारणीमध्ये १२-६१-० किंवा ०-५२-३४ (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) मिसळावे.
- झाडांना योग्य ताण बसला असल्यामुळे पाने पिवळी असताना, इथेफॉन (३९ एसएल) १ मिलि प्रति लिटर पाणी अधिक १२-६१-० किंवा ०-५२-३४ ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
- जर फांद्यांची घनता जास्त असेल, तर हवा खेळती राहण्यासाठी व सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी पेन्सिल आकाराच्या फांद्या शेंड्याकडून १० ते १५ सेंमी. कट करून हलकी छाटणी करावी आणि खोडापासूनचे फुटवे (वॉटर शूट) काढावेत.
(सोसाट्याचा वारा व पावसाचा अंदाज घेवुनच पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करावी)
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी