Banana Farming : जास्त उन्हामुळे केळीच्या पानांचे जळणे, वाढ खुटोण, फळांचा आक्कार कमी होणे, कच्ची फळे गळणे, घडाची गुणवत्ता कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. योग्य उपाययोजना करून उत्पादन व गुणवत्ता वाढवता येते, या उपाययोजना समजून घेऊयात...
मल्चिंग करा
- झाडाभोवती सुकी पाने, कार्ड, गवत, ऊसाच्या पाचटाचे आच्छादन करा.
- मातीतील ओलावा टिकून राहतो.
- जमिनीचे तापमान कमी राहते.
ठिबक सिंचन वापरा
- ठिबक सिंचनाने पाणी हळूहळू व थेट मुळांजवळ पोहोचते.
- सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या.
- जमिनीत ओलावा कायम राहतो.
- पाण्याचा ताण येऊ देऊ नका.
आंतरपीक/ सावली निर्माण
- सुरवातीच्या अवस्थेत डाळी पिके (उडीद, मुग) लावा.
- यामुळे जमिनीवर सावली पडते. तापमान कमी राहते.
अॅटी-ट्रान्सपिरंट फवारणी
- झाओलिन (Kaolin) 5% फवाराणी करा.
- किंवा सिलिकॉन आधारित अॅटी-ट्रान्सपिरंट वापर.
- पानांमधून होणारे पाणी बाष्पीभवन कमी होते.
घडांचे संरक्षण
- घडावर कव्हर (Bunch Cover) वापरा (पॉलिथीन/कापड).
- फळे उन्हामुळे काळी पडत नाहीत व दर्जा चांगला राहतो.
वाऱ्यापासून संरक्षण
- शेताच्या कडेला झाडे / वारा अडवणारे पडदे (Windbreaks) लावा.
- गरम वाऱ्याचा परिणाम कमी होतो.
संतुलित खत व्यवस्थापन
- POTASH (MOP)
- पोटॅश (Potash) जास्त प्रमाणात द्या.
- पोटॅशामुळे झाडाची ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
लक्षात ठेवा :
- पाने जळलेली दिसल्यास त्वरित पाणी द्या.
- जमिनीत भेगा पडू देऊ नका.
- दुपारी फवारणी टाळा.
- सकाळी किंवा संध्याकाळीच सर्व उपाय करा.
- कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर जि हिंगोली
