Amba Lagvad : आंब्याच्या नवीन लागवडीसाठी जून ते ऑगस्ट (पावसाळ्याची सुरुवात) हा काळ सर्वोत्तम मानला जातो, विशेषतः जिथे पुरेसा पाऊस पडतो. जर पाण्याची उत्तम सोय असेल, तर फेब्रुवारी-मार्च महिन्यांतही लागवड करता येते. लागवड करताना जमिनीची निवड अतिशय महत्वाची ठरते.
जमीन कोणती निवडावी ?
- मध्यम काळी, हलकी २.५ ते ३.० फुटावर मुरूम असणारी जमीन सर्वात उत्तम मानली जाते.
- उत्तम पाण्याचा निचरा होणारी
- जमिनीची खोली किमान १.५ ते २.५ मीटर असावी.
- जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ किंवा ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा.
- सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असावे.
कोणती जमीन निवडू नये ?
- चुनखडीचे प्रमाण ८-१०% पेक्षा जास्त असल्यास आंबा लागवड करू नये.
- क्षारयुक्त व चोपण जमिनी झाडांच्या वाढीसाठी घातक ठरतात.
- पृष्ठभागावर लगेच कठीण खडक असणारी जमीन टाळावी.
- ज्या जमिनीत पाणी साठून राहते (पाणथळ), अशा ठिकाणी मुळे कुजण्याची भीती असते.
टीप : लागवडीपूर्वी माती परीक्षण करावे.
- डॉ. संतोष चव्हाण, संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी
