Lokmat Agro >स्मार्ट शेती > Mahadbt Update : महाडीबीटी लॉटरी अपडेट, तुम्हालाही मॅसेज आलाय का? जाणून घ्या सविस्तर 

Mahadbt Update : महाडीबीटी लॉटरी अपडेट, तुम्हालाही मॅसेज आलाय का? जाणून घ्या सविस्तर 

Latest News agriculture Scheme farmers get Maha DBT Lottery Update message Know the details | Mahadbt Update : महाडीबीटी लॉटरी अपडेट, तुम्हालाही मॅसेज आलाय का? जाणून घ्या सविस्तर 

Mahadbt Update : महाडीबीटी लॉटरी अपडेट, तुम्हालाही मॅसेज आलाय का? जाणून घ्या सविस्तर 

Mahadbt Update : या पोर्टलवर अर्ज केलेल्या आणि पोर्टलच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Mahadbt Update : या पोर्टलवर अर्ज केलेल्या आणि पोर्टलच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Mahadbt Update : राज्यातील अनेक शेतकरी योजना या महाडीबीटी पोर्टलच्या (Mahadbt Portal) माध्यमातून राबवल्या जातात. या पोर्टलवर अर्ज केलेल्या आणि पोर्टलच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मात्र अनेक योजनांबाबत सरकारची उदासीनता दिसून येत असल्याचं चित्र आहे. योजनांचे लॉटरी न लागणे, लागलेल्या लॉटरीचे पूर्वसंमती न देणे आणि अनुदानाचा वितरण न होणे अशा सर्व बाबी सध्या सुरू आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विहीर योजनेत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत शेतकऱ्यांकडून या योजनेची लॉटरी कधी लागणार याबाबत विचारणा होत आहे. यामध्ये पाहिलं तर एकात्मिक फलोत्पादन, बियाणे अर्ज योजना सिंचन, तुषार अशा योजना (Agriculture Scheme) आहेत. 

या योजनांसाठी केंद्र शासनाकडून (Central Government) निधी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातून काही जुन्या योजनांचा अनुदान विपरीत करण्यात आले, मात्र नवीन योजनांचे काय? तर याबाबत आता शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. 

दरम्यान या योजनांमध्ये सौरचलित फवारणी यंत्र या योजनेत सर्वाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या योजनेबाबतचे मॅसेज येण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला मेसेज येत असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन याची शहानिशा करायची आहे.

जर शासन लॉटरी अनुदान वितरण वितरित करणार असेल तर याबाबत पूर्वसंमती घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करेल. तोपर्यंत शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्जाची सद्यस्थिती तपासणे आवश्यक आहे.
 

Web Title: Latest News agriculture Scheme farmers get Maha DBT Lottery Update message Know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.