अतिवृष्टी झाल्यानंतर खरीप पिकामध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. कारण ओलसर वातावरणामुळे बुरशीजन्य रोग व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो त्यसाठी पिकानुसार खालील उपाय करावेत.
अतिवृष्टी झाल्यानंतर पिकामध्ये करावयाच्या उपाययोजना
कांदा -
- रोप वाटिकेतील मर रोग नियंत्रणासाठी रोपवाटिकेच्या मातीमध्ये ट्रायकोडर्मा कल्चर २.५ किग्रॅ शेणखत १०० किग्रॅ एकत्र मिसळून वापरावे.
- जांभळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर किवा बेनलेट १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- त्यानंतर डिथेन Z-78 २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून स्टिकर सह फवारणी करावी.
- काळा कर्जा (पीळ रोग) रोगाच्या डायफेनोकॉनाझोल २५% ईसी १० मि.ली. १० लिटर पाणी किंवा टेबुकोनाझोल २५.९ टक्के ईसी किंवा अझोक्सीस्ट्रोबिन १८.२ टक्के + डायफेनोकॉनाझोल ११.४% एससी १० मि.ली./१० लिटर पाणी फवारणीस वापरावे.
- फवारणी दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने करून, २ ते ३ वेळा आळीपाळीने करावी.
- फुल किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5% SC १ मि.ली. लि. पाणी किवा स्पिनोसायड 45% SC 0.3 मि.ली. लि. पाणी किवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के SL 0.3 मि.ली. लि. पाणी किंवा लॅम्ब्डा सायहॅलोथ्रिन 5% EC 0.5 मि.ली./लि. पाणी प्रमाण घेऊन आलटून पालटून फवारणी करावी.
टोमॅटो -
- अतिवृष्टीमुळे उशीरा येणारा करपा (Late blight), पानगळ, मुळ कुजणे यांचा प्रादुर्भाव वाढतो.
- नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के WP २५ ग्रॅम / १० लिटर पाणी किंवा अझोक्सीस्ट्रोबिन डिफेनोकोनॅझोल SC १० मि.ली./१० लि. पाणी घेऊन फवारणी करावी.
- रोगग्रस्त पाने किंवा झाडे लगेच काढून नष्ट करावीत
- पाणी साचल्यास पांढरी माशी, तुडतुडे, फळकिडी यांचा प्रादुर्भाव वाढतो.
- नियंत्रणासाठी स्पिनोसायड 45 टक्के SC ३ मि.ली./१० लि. पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% SL 0.5 मि.ली. लि. पाणी घेऊन फवारणी करावी.
- विशाल चौधरी, विषय विशेषज्ञ, पिकसंरक्षण
कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव