Lokmat Agro >स्मार्ट शेती > नाशिक जिल्ह्यातील भात, नागली, वरई, खुरासणीसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

नाशिक जिल्ह्यातील भात, नागली, वरई, खुरासणीसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

Latest News Agricultural advice for rice, nagli, varai, khurasani in Nashik district, read in detail | नाशिक जिल्ह्यातील भात, नागली, वरई, खुरासणीसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

नाशिक जिल्ह्यातील भात, नागली, वरई, खुरासणीसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

Agriculture Advice : अशा परिस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत आहे. दुसरीकडे भात, नागली, वरई, खुरासणी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

Agriculture Advice : अशा परिस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत आहे. दुसरीकडे भात, नागली, वरई, खुरासणी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture Advice :    सध्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. अशा परिस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत आहे. दुसरीकडे भात, नागली, वरई, खुरासणी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. अशावेळी काय उपाय योजना कराव्यात, हे समजून घेऊयात... 

खरीप भात (वाढीची अवस्था /फुटवे फुटणेची अवस्था)
भात शेतातील जास्तीचे पाणी काढून टाकावे व पाण्याची पातळी ३ ते ५ सेमी पर्यंत ठेवावी.
सद्यस्थितीत भात पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा (स्थानिक भाषेत टाक्या) प्रादुर्भाव दिसून आल्यास सायपरमेथ्रीन ०.५ मिली किंवा क्विनालफॉस १.५ मि.ली. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
नत्रयुक्त खते प्रमाणापेक्षा जास्त टाकू नयेत, अन्यथा करपा रोगाचे प्रमाण वाढते.

पाणी व्यवस्थापन : भात पिकाच्या योग्य वाढीकरिता व अधिक उत्पादनाकरीता भात खाचरात पाण्याची योग्य पातळी राखणे आवश्यक आहे. 
पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी पुढीलप्रमाणे असावी.
खाचरात पिकाच्या योग्य वाढीसाठी रोपांच्या अधिक फुटव्याच्या अवस्थेत पाण्याची पातळी ३ ते ५ सेमी असावी. 

खरीप नाचणी व वरई (वाढीची अवस्था /फुटवे फुटणेची अवस्था)
नाचणी पिकावरील पाने खाणारी अळीसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बांधावरील गवत व तण उपटून नष्ट करावे.
आंतरमशागत : एक कोळपणी व एक खुरपणी करावी. एक कोळपणी २० ते २५ दिवसांनी करावी. एक खुरपणी ४५ ते ६० दिवसांनी करावी.

खुरासणी (वाढीची अवस्था / आंतरमशागत)
पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता खुरासणी पिकाची पेरणी नंतर ५० दिवसांनी शेंडा खुडावा. 
त्यामुळे झाडावरील फांद्यांची संख्या वाढून उत्पादनात वाढ होईल. 
तसेच खुरासणी पिकात पाने खाणारी अळी आढळून आल्यास क्लोरोपायरीफॉस २ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

(घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता वरील सर्व कामे प्रसारित केलेल्या दिवसाकरिता स्थगित कराव्यात किंवा पढील चार दिवस पढे ढकलावीत.)


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Agricultural advice for rice, nagli, varai, khurasani in Nashik district, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.