Join us

Kakadi Lagwad : उन्हाळी हंगामात कमी कालावधीचं काकडी पिक ठरतंय फायदेशीर; कशी कराल लागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:14 IST

काकडी हे उष्ण व कोरडे वाढणारे पीक असून, पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी उपयुक्त आहे. खरीप तसेच उन्हाळी हंगामात काकडी पीक फायदेशीर आहे.

काकडी हे उष्ण व कोरडे वाढणारे पीक असून, पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी उपयुक्त आहे. खरीप तसेच उन्हाळी हंगामात काकडी पीक फायदेशीर आहे.

कोकणात तर पावसाळ्यात चांगले उत्पन्न मिळते. नियमित आहारात काकडीचा उपयोग केला जात असल्याने या पिकाला चांगला बाजारभाव मिळतो. खरीप हंगामात काकडीची लागवड जून, जुलै महिन्यात तसेच उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यापासून करतात.

पूर्वमशागतशेतात उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी व एक वखरणी द्यावी. त्यानंतर शेतात आवश्यकतेनुसार चांगले कुजलेले शेणखत टाकावे व नंतर वखरणी करावी.

लागवड कशी कराल?उन्हाळी हंगामासाठी ६० ते ७५ सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात व एक फुटाच्या अंतरावर एका बीची लागवड करावी. एक एकर काकडी लागवडीसाठी एक किलो बियाणे लागते.

व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी- काकडी हे तीन महिन्यात तयार होणारे पीक आहे. लागवडीसाठीचा खर्च अत्यल्प आहे.- उन्हाळी लागवड जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली असता, एप्रिलपासून उत्पादन प्राप्त होते.- हायब्रीड काकडीचे २०० ग्रॅम बियाणे एक एकर लागवडीसाठी पुरेसे ठरते.- काकडीमध्ये पाण्याचा अंश असल्याने उन्हाळी हंगामात चांगली मागणी असते.- या पिकाची लागवड तिनही हंगामात करता येते.- पाण्याची उपलब्धता व मल्चिंग पेपरचा वापर केल्यास चांगले उत्पादन काढता येते.- सुधारित जातींची लागवड, नियोजनबद्ध खत आणि पाणी व्यवस्थापन, कीड रोगांचे नियंत्रण या गोष्टीचे चांगले नियोजन केल्यास काकडी लागवड फायद्याची आहे.- लागवडीनंतर एका महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी.

खत व पाणी व्यवस्थापन- काकडी पिकासाठी ५० किलो नत्र, ५० किलो पालाश व ५० किलो स्फूरद लागवडीपूर्वी द्यावे.- लागवडीनंतर एका महिन्याने नत्राचा ५० किलोचा दुसरा हप्ता द्यावा. पुढील खताचा डोस विद्राव्य खतांमधून द्यावा.- उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.- पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

काढणीकाकडी पिकाची काढणी फळे थोडी कोवळी असताना करावी. काकडीचे उत्पादन हे जाती व हंगामानुसार प्रति एकरी १०० ते १२० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

अधिक वाचा: Karali Lagwad : उन्हाळी हंगामात फायद्याची फळभाजी 'कारले'; कशी कराल लागवड?

टॅग्स :भाज्यालागवड, मशागतपीकशेतकरीशेतीपेरणीपीक व्यवस्थापन