"हर खेत को पानी", "Catch The Rains When it Falls Where it Falls" ही संकल्पना राबविण्याकरिता शेत जमिनीच्या प्रत्येक एक एकर शेतीमधील उताराचे ठिकाण शोधून जलतारा करावयाचा आहे.
जलतारा महत्व व त्यामुळे होणारा बदल◼️ आपल्या घरातील पाणी ज्या प्रमाणे शोषखड्यामध्ये मुरवण्याचे नियोजन केले जात आहे. त्याच प्रमाणे आपल्या शेतातील पाणी आपल्याच शेतात जिरवण्यासाठी जलतारा उपयोगाचा आहे.◼️ एक एकर क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे वाहून जाणारे पाणी या जलतारा मध्ये जिरवणे शक्य आहे.◼️ एक जलतारा खड्डा ४ महिन्यात ३.६० लक्ष लिटर पाणी जमीनीमध्ये मुरवतो.◼️ साधारणपणे असे म्हटल्या जाते की, पडणाऱ्या पावसाचे ३५% पाणी वाहून जाते हे वाहून जाणारे पाणी जलतारा उपचार माध्यमातून पाणी अडवून जिरवणे शक्य होत आहे.◼️ यामुळे सिंचन विहिरीची पाणी पातळी वाढून सिंचन विहिरीला पाझर जास्त काळ टिकण्याचा कालावधी वाढणार आहे.◼️ जलतारा केलेल्या शेतातील पाणी त्याच शेतात मुरते जेणेकरून जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकतो यामुळे जमिनीत असलेल्या विहिरीसाठी Recharge होण्यास मदत होते.◼️ शेतामध्ये एकच वेळेस जास्त पाऊस झाल्यास पाणी साचुन राहत नाही. त्याने शेतातील पिकाची उत्पादकता वाढते तसेच शेतजमीन चिबड होण्यापासून बचाव होतो.◼️ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेचा मूलभूत उद्देश ग्रामीण कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना अकुशल कामाची मागणी केल्यानंतर कामे उपलब्ध करून देणे आहे. तसेच जलताराच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची व्यवस्था शेतकऱ्यास उपलब्ध करणे हा मुख्य हेतू आहे.
जलतारा कसा आणी कुठे काढावा?◼️ सर्वात आधी आपल्या शेतीचा (किमान एक एकर क्षेत्राचा) उतार असलेला भाग तसेच आपल्या शेतातील पाणी कुठल्या भागात एकवटल्या जाते याचा शोध घ्यावा व या भागाची जलतारासाठी निवड करावी.◼️ ज्या भागात जमीन सपाट नसेल अशा ठिकाणी डाळीचे बांध तयार करून जलतारा करता येईल.◼️ शेताच्या निवड केलेल्या उतार भागात ५ फुट (रुंदी) X ५ फुट (लांबी) ६ फुट खोलीचा एक खड्डा तयार करावा. (१.५ मी X १.५ मी. X १.८० मी) ◼️ हा खड्डा मोठ्या आकाराच्या कठीण प्रकारच्या (टोळ) दगडाने भरावा.◼️ खड्यात प्राधान्याने ८० मिमी. तसेच १०० मिमी. आकाराचे दगड वापरण्यात यावेत.◼️ हा खड्डा भरतांना शोषखड्ड्यांसारखे त्यावर छोटे दगड किंवा मुरुम टाकु नये.◼️ जलतारासाठी मनरेगा विहिरीवरील दगड वापरता येईल.◼️ डोंगरी विभागाकरीता (Hilly Area) जलतारा चे कामाची अंदाजपत्रकीय किंमत ५,२६४ रु. असुन या कामावर १७ मनुष्यदिन निर्माण होतील. या विभागासाठी जलताराचे अकुशल/कुशल चे प्रमाण ९०.५०/९.५० असे आहे.◼️ इतर विभागाकरीता जलतारा चे कामाची अंदाजपत्रकीय किंमत ४,६४३ रु. असुन या कामावर १५ मनुष्यदिन निर्माण होतील. या विभागासाठी जलताराचे अकुशल/कुशल चे प्रमाण ८९.२३/१०.७७ असे आहे.
अधिक वाचा: कोणत्या जमिनीत किती प्रमाणात गाळ भरावा हे कसे ठरविले जाते? जाणून घ्या सविस्तर