ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या अनेक संकटे उभी आहेत. यातील प्रमुख संकट म्हणजे गेल्या अनेक पीक वर्षापासून एकाच जमिनीत उसाचे पीक घेतल्यामुळे एकरी ऊस उत्पादन घटत चालले आहे.
उत्पादन खर्च मात्र वाढत चालला आहे. तसेच रासायनिक खतांच्या आणि पाण्याच्या अतिरेकी वापरामुळे आणि गेल्या अनेक वर्षापासून उसाचे पाचट शेतातच जाळल्यामुळे जमिनीचा पोत कमी होत चालला आहे.
शीच पुनरावृत्ती दरवर्षी होत राहिल्यास ऊस पिकाखालील क्षेत्र क्षारपड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे उसाचे पाचट शेतातच जाळणे आहे. म्हणून शेतजमिनीचा पोत टिकतो.
१) पाच सरी पाचट पद्धत
◼️ सर्व सऱ्यांमध्ये पाचट ठेवून उसाचे खुंट उघडे केले जातात आणि सरीत जेथून पाणी दिले जाते.
◼️ तेथील पाच ते सहा फूट अंतरावरील पाचट काढले जाते.
◼️ या पद्धतीत खते फेकून न देता दोन हप्त्यात पाळीपाळीने द्यावीत.
२) सरी आड सरी पाचट पद्धत
◼️ यात सरी आड सरीत पाचट दाबले जाते आणि मोकळ्या सरीतून खते आणि पाणी देता येते.
◼️ ऊस तोडीच्या वाहनामुळे सरी-वरंबा सपाट झालेले असतात आणि पाणी देण्याची अडचण होते, अशावेळी या पद्धतीचा वापर करावा.
अधिक वाचा: शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद आता मिटणार; सुरु होतोय 'हा' पथदर्शी प्रकल्प
