lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > खतांवरील खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचय.. मग वापरा ही खते

खतांवरील खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचय.. मग वापरा ही खते

If you want to reduce the cost of fertilizers and increase the income.. then use these fertilizers | खतांवरील खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचय.. मग वापरा ही खते

खतांवरील खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचय.. मग वापरा ही खते

उपलब्ध मजूर, अन्नद्रव्यांची कार्यक्षमता मातीतून दिल्या जाणाऱ्या खतामुळे शेतात वाढणारे तण आणि उत्पादनातील वाढ लक्षात घेता विद्राव्य खते फायदेशीर ठरतात. त्यामुळे कोणती विद्राव्य खते आपण वापरू शकतो.

उपलब्ध मजूर, अन्नद्रव्यांची कार्यक्षमता मातीतून दिल्या जाणाऱ्या खतामुळे शेतात वाढणारे तण आणि उत्पादनातील वाढ लक्षात घेता विद्राव्य खते फायदेशीर ठरतात. त्यामुळे कोणती विद्राव्य खते आपण वापरू शकतो.

शेअर :

Join us
Join usNext

पेरताना अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास आणि तोही संतुलित नसल्यास अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येतात. यामुळे, पिकांची शाखीय वाढ जरी झाली तरी फुलोरा तसेच धने भरण्याच्या काळात अन्नद्रवे कमी पडल्यास अपेक्षित उत्पादन मिळण्यास अडचणी येतात.

त्यामुळे ८०-९० दिवसात येणाऱ्या पिकामध्ये पेरणीच्या ३० दिवसानंतर तसेच ४५ दिवसानंतर आणि कापूस आणि तूर यासारख्या पिकामध्ये पेरणीनंतर ३०-३५, ४०-६० आणि ८०-९० दिवसानंतर अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास पिकांच्या प्रत्येक अवस्थेमध्ये अन्नद्रव्यांचे संतुलन झाल्याने फुलोरा चांगला येऊन दाने भरण्यास मदत होते.

पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी नत्र आणि स्फुरद तसेच ४०-४५ दिवसानंतर पालाश या अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यास अत्यंत चांगले परिणाम दिसून येतात. पीक वाढीच्या काळात अन्नद्रव्यांचा पुरवठा हा नेहमीच्या रासायनिक खतामधून अथवा विद्राव्य खतामधून करता येतो.

उपलब्ध मजूर, अन्नद्रव्यांची कार्यक्षमता मातीतून दिल्या जाणाऱ्या खतामुळे शेतात वाढणारे तण आणि उत्पादनातील वाढ लक्षात घेता विद्राव्य खते फायदेशीर ठरतात. त्यामुळे कोणती विद्राव्य खते आपण वापरू शकतो.

विद्राव्य खते
विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तीक आहे . ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेत देण्याकरिता फायदेशीर आहेत.

विद्राव्य खते फवारणीद्वारे देत असताना स्टीकर्स वापरणे फायद्याचे असते. बाजारामध्ये वेगवेगळी खतांची ग्रेड उपलब्ध आहेत. त्या त्या अवस्थेमध्ये ती ग्रेड फवारल्यास सर्वच पिकांमध्ये खतांवरील खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळी खतांच्या ग्रेडची निवड करून त्यांची पिकांवर फवारणी करावी.

विद्राव्य खतांचे महत्व
• विद्राव्य खते ही मातीतून दिल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या तुलनेत पिकांना लवकर उपलब्ध होतात
• रासायनिक खते जमिनीतून देण्यासाठी उशीर झाला असल्यास, ही खते फवारणीद्वारे देता येतात
• पिकांचे उत्पादन आणि रासायनिक खताचा शास्त्रोक्त वापर यात सांगड घालणे सोपे जाते.
• विद्राव्य खते विभागून देता येतात.
• पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेतून निचरून किंवा वायुरूपात वाया जाण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे विद्राव्य खतांची कार्यक्षमता ही ७० ते ८० टक्के राहते
• विद्राव्य खतांची कार्यक्षमता ही जमिनीचे गुणधर्म, पाण्याची गुणवत्ता, खताची क्षारता, खाते देण्याचा कालावधी आणि खते देण्याची साधने यावर अवलंबून असते

विद्राव्य खतांचा वापर केव्हा करावा?
• जास्त पाण्यामुळे पिकांना अन्नद्रवे मिळत नसल्यास
पीक अन्नद्रव्याची कमतरता दर्शवित असल्यास
• मातीतून दिल्या जाणाऱ्या खतांची कार्यक्षमता खूप कमी असल्यास
• सिंचनाची आणि सिंचन संचाची उपलब्धता असल्यास
• फवारणी करण्या करिता असलेल्या सुविधा उपलब्ध असल्यास

विविध ग्रेडचे विद्राव्य खते खालीलप्रमाणे
१) १९:१९:१९ / २०:२०:००
२) १२:६१:००
३) ००:५२:३४ 
४) १३:०:४५ 
५) ००: ००: ५०
६) १३: ४०: १३ 
७) कॅल्शियम नायट्रेट (Calcium Nitrate)
८) २४:२४:००

माती परीक्षण आधारित एकीकृत खत व्यवस्थापन आणि पीक वाढीच्या काळात फवारणीद्वारे किंवा ठिबक सिंचनाद्वारे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा करून जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

अधिक वाचा: स्फुरदयुक्त सेंद्रिय खत सुपर फॉस्फो कंपोस्ट घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत

Web Title: If you want to reduce the cost of fertilizers and increase the income.. then use these fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.