Lokmat Agro >स्मार्ट शेती > तूर पिकात काढणीच्या कालावधीनुसार व पिक पद्धतीप्रमाणे वाण कसे निवडाल?

तूर पिकात काढणीच्या कालावधीनुसार व पिक पद्धतीप्रमाणे वाण कसे निवडाल?

How to select varieties according to harvesting period and cropping method in tur crop? | तूर पिकात काढणीच्या कालावधीनुसार व पिक पद्धतीप्रमाणे वाण कसे निवडाल?

तूर पिकात काढणीच्या कालावधीनुसार व पिक पद्धतीप्रमाणे वाण कसे निवडाल?

Tur Variety तूर पिकाचे जास्तीत उत्पन्न घेण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार आणि पर्जन्यमान प्रमाणे योग्य वाणांची निवड करणे अति आवश्यक आहे, ज्यामुळे तुर पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत होते.

Tur Variety तूर पिकाचे जास्तीत उत्पन्न घेण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार आणि पर्जन्यमान प्रमाणे योग्य वाणांची निवड करणे अति आवश्यक आहे, ज्यामुळे तुर पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत होते.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या महाराष्ट्रात आणि मुख्यतः विदर्भात लागवडीखालील बहुतेक वाण मध्यम लवकर आणि मध्यम ते उशिरा कालावधीचे आहेत. महाराष्ट्रात सुमारे ९० टक्के पेक्षा जास्त क्षेत्र या वाणांखाली येते. मागील काही वर्षाच्या संशोधनाव्दारे हळव्या (मध्यम लवकर तयार होणाऱ्या) तसेच निम गरव्या (मध्यम उशिरा) सुधारीत वाणांचा विकास झाला आहे.

तूर पिकाचे जास्तीत उत्पन्न घेण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार आणि पर्जन्यमान प्रमाणे योग्य वाणांची निवड करणे अति आवश्यक आहे, ज्यामुळे तुर पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत होते.

परिपक्व होण्याचा कालावधी
तुरीचे पीक परिपक्व होण्यास लागणाऱ्या कालावधीनुसार वाणांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात येते.
१) अति लवकर होणारे वाण : १३० दिवसाच्या आधी
२) लवकर परिपक्व होणारे वाण : १३१ ते १५० दिवस
३) मध्यम लवकर तयार होणारे वाण : १५१ ते १६५ दिवस
४) मध्यम कालावधीचे वाण : १६६ ते १८५ दिवस
५) उशिरा परिपक्व होणारे वाण : १८६ दिवसांपेक्षा अधिक

जमिन आणि पर्जन्यमान प्रमाणे हळवे/गरवे वाण
१) मध्यम जमीन तसेच मध्यम पर्जन्यमान असल्यास लवकर तयार होणारे वाण उदा. ए.के.टी. ८८११, आय.सी.पी.एल. ८७ (प्रगति) फुले राजेश्वरी, गोदावरी, रेणूका, फुले तृप्ती यापैकी सुधारीत वाणाची निवड करणे योग्य ठरते.
२) मध्यम ते भारी जमीन आणि खात्रीचे पर्जन्यमान असल्यास मध्यम कालावधीचे वाण उदा. पीकेव्ही तारा, विपूला, बी.एस.एम.आर. ७३६, बी.एस.एम.आर. ८५३, बी.डी.एन ७०८, बी.डी.एन. ७१६, पीडीकेव्ही आश्लेशा, या वाणापैकी निवड करुन लागवड केल्यास जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे शक्य होते.
३) भारी जमीन तसेच खात्रीचे पर्जन्यमान असल्यास उशिरा तयार होणारे वाण उदा. आशा (आय.सी.पी.एल. ८७११९) अथवा पीडीकेव्ही अश्लेशा या वाणांची लागवड करून भरघोस उत्पादन मिळविता येते.

पीक पध्दती प्रमाणे वाणंची निवड
१) दुबार पीक
तूर पिकानंतर लगेच दुसरे पीक घ्यावयाचे असल्यास लवकर तयार होणारे वाण उदा. ए.के.टी. ८८११ए आय.सी.पी.एल. ८७ (प्रगति) यापैकी निवड करुन पेरणी करावी.
२) आंतरपिक
तुर पिकामध्ये साधारणपणे मुग, उडीद, सोयाबीन, ज्वारी इ. पिके आंतरपिक म्हणून घेतल्या जातात. त्याकरीता मध्यम ते उशिरा तयार होणारे वाण उदा. आशा, बी.एस.एम.आर. ८५३, पीकेव्ही तारा, पीडीकेव्ही आश्लेशा यापैकी वाणाची निवड करणे योग्य ठरते.

अधिक वाचा: Soybean Variety अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कमी दिवसात येणारे सोयाबीनचे वाण

Web Title: How to select varieties according to harvesting period and cropping method in tur crop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.