lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > माती व पिकांसाठी अमृत असणारं हे जीवाणू खत कसे बनवाल?

माती व पिकांसाठी अमृत असणारं हे जीवाणू खत कसे बनवाल?

How to make this bacterial fertilizer that is nectar for soil and crops? | माती व पिकांसाठी अमृत असणारं हे जीवाणू खत कसे बनवाल?

माती व पिकांसाठी अमृत असणारं हे जीवाणू खत कसे बनवाल?

जीवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते. त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाखीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.

शेअर :

Join us
Join usNext

जीवामृत निर्मिती व वापर

साहित्य
■ २०० लिटर क्षमतेचे प्लॅस्टिक बॅरल किंवा सिमेंटची टाकी.
■ १० किलो देशी गायीचे ताजे शेण.
■ १० लिटर देशी गायीचे गोमूत्र.
■ २ किलो काळा गावरान गूळ.
■ २ किलो कोणत्याही कडधान्याचे पीठ (बेसन).
■ २ किलो वडाच्या झाडाखालची किंवा बांधावरील (शेतातील) जिवाणू माती (गाळ).
■ उपलब्ध असल्यास १०० ग्रॅम रायझोवीयम, पीएसवी यासारखी जिवाणू संवर्धके.

कृती
■ जीवामृत तयार करण्यासाठी २०० लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅरल किंवा सिमेंट टाकीमध्ये १७० लिटर स्वच्छ पाणी घ्यावे.
■ त्यात १० किलो शेण, १० लिटर गोमूत्र, २ किलो काळा गूळ, २ किलो बेसन, २ किलो जिवाणू माती किंवा १०० ग्रॅम उपलब्ध जिवाणू संवर्धक मिसळावी.
■ डावीकडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे २ ते ३ वेळा ढवळावे.

वापर कसा करावा?
■ ७ दिवसांत पिकांना देण्यासाठी जिवामृत तयार होते.
■ एका एकराला २०० लिटर जीवामृत पुरेसे होते. जास्त क्षेत्र असल्यास बॅरलची संख्या वाढवावी.
■ गोमूत्राची उपलब्धता जास्त असल्यास पाण्याचे प्रमाण कमी करावे.
शेतकरी जीवामृत तयार करण्यासाठी विविध प्रमाणात साहित्य वापरतात ते द्रावण ठेवण्याचे दिवसही वेगवेगळे आहेत. मात्र, वरील साहित्य किमान व योग्य प्रमाणात आहेत.
■ जीवामृत ३० दिवसांच्या आत वापरावे.

जीवामृताचे फायदे
■ जीवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते. त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते.
■ पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाखीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.
■ जीवामृताचा वापर केलेल्या शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चांगली राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
■ शेती पद्धतीत सेंद्रीय घटकांचा वापर वाढवल्यावर जिवाणूंना खाद्य उपलब्ध होते. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
■ सेंद्रीय पदार्थांमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकतात.
■ जीवामृताच्या वापरामुळे कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते.

अधिक वाचा: या सात धान्यांपासून तयार करा अशी स्लरी, जी ठेवेल मातीची तब्येत बरी

Web Title: How to make this bacterial fertilizer that is nectar for soil and crops?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.