स्फुरद (पी) फॉस्फरस/स्फुरद हे अन्नद्रव्य मातीमध्ये सहजासहजी विरघळत नाही. त्यामुळे किंवा त्याच्या गतीमध्ये स्थिर राहण्याचा गुणधर्म असल्यामुळे पिकामध्ये स्फुरदची कमतरता आढळून येते.
याचा परिणाम पिकावर होत असतो. त्यामुळे त्याचे परिणाम समजून घेणेही महत्त्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे पिकांवर काय परिणाम होतो ते पाहूया.
पिकांवर होणार परिणाम
◼️ रोपांची वाढ खुंटते.
◼️ रोपांची उंची कमी राहते.
◼️ झाडे कमजोर होतात.
◼️ वनस्पतीची जुनी पाने गडद हिरवी होतात.
◼️ नंतर जांभळी, तांबूस, निळसर छटा दिसते.
◼️ तसेच पानांच्या कडा वाळतात आणि पानांची संख्याही कमी होते.
◼️ फुलधारणा उशिरा होते.
◼️ तसेच फळे आणि शेंगा यांचा आकार लहान होतो.
◼️ धान्यामध्ये आकार लहान होतो.
यावर काय कराल उपाय?
◼️ स्फुरदयुक्त खतांचा वापर करणे.
◼️ यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी), डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) तसेच स्फुरदयुक्त खताबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करणे.
◼️ यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, फॉस्फेट सोलीबल बॅक्टेरिया (पीएसबी) याचाही वापर स्फुरद उपलब्धतेसाठी करणे आवश्यक आहे.
◼️ मायकोरायझा जिवाणूचा वापर केल्यास स्फुरदचे शोषण चांगल्या प्रकारे वनस्पतींना होते.
◼️ मातीमधील सामू संतुलित ठेवणे गरजेचे आहे (७.०० ते ८.००)
◼️ जमीन क्षारता मर्यादित ठेवणे (१.०० पेक्षा कमी)
अशा रीतीने व्यवस्थापन केल्यास स्फुरदची उपलब्धता होऊन पिकाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनातही वाढ होते.
अधिक वाचा: तूर पिकात होणार क्रांती; मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित 'ह्या' नवीन संकरित वाणाला मान्यता
