Lokmat Agro >स्मार्ट शेती > कापूस पिकातील गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची? वाचा सविस्तर

कापूस पिकातील गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची? वाचा सविस्तर

How to identify different branches in cotton crop? Read in detail | कापूस पिकातील गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची? वाचा सविस्तर

कापूस पिकातील गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची? वाचा सविस्तर

गळफांदी कापायच्या अगोदर तुम्हाला फळफांदी व गळफांदी नेमकी कोणती आहे हे माहिती करून घेणे गरजेचे आहे.

गळफांदी कापायच्या अगोदर तुम्हाला फळफांदी व गळफांदी नेमकी कोणती आहे हे माहिती करून घेणे गरजेचे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कपाशीतील फळ फांदी (Reproductive branch) ही ती फांदी असते जिला कपाशीची बोंडे लागतात, तर गळ फांदी (Vegetative branch) ही अशी फांदी असते जी मुख्य रोपाची वाढ करते पण तिला बोंडे लागत नाहीत, म्हणजेच ती फक्त शाखीय वाढ करते. 

कपाशी पिकात गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची?

  1. गळफांदी कापायच्या अगोदर तुम्हाला फळफांदी व गळफांदी नेमकी कोणती आहे हे माहिती करून घेणे गरजेचे आहे.
  2. साधारणपणे एका झाडावर तीन किंवा चार गळफांद्या असतात व ही फांदी खोडाच्या अगदी सुरुवातीला लागून किंवा खोडाला समांतर वाढते.
  3. त्या उलट फळफांद्या या जमिनीला समांतर वाढतात. साधारणपणे गळफांदी ही लागवड केल्यानंतर ४० दिवसांनी ओळखता येते.
  4. कालावधीत या फांद्यांवर पाने व शेंडांवर काही प्रमाणामध्ये पाते लागल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे फांदी अचूकपणे ओळखून खोडापासून एक इंच अंतरावर धारदार कटरच्या साह्याने कापावी.
  5. तसेच गळफांदी कापताना खोडाची साल निघू नये किंवा झाडाला इजा होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी.
  6. तसेच शेंडा खुडताना झाडाची उंची तीन फूट झालेली आहे याची खात्री करावी व त्यानंतरच सहा इंच लांबीचा शेंडा कटरच्या साह्याने कापावा.

अधिक वाचा: शेतजमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी सातबाऱ्यावरील 'ह्या' गोष्टी पाहणे महत्वाचे

Web Title: How to identify different branches in cotton crop? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.