एखाद्या जमिनीच्या गाव नमुना सातबारा सदरी नावे असलेल्या खातेदारांपैकी एखादा खातेदार मयत झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसांची नावे गाव नमुना सात-बारा सदरी दाखल झालेली असतात.
अशा वारस खातेदारांपैकी एखादा खातेदार मयत झाल्यास, आणि अन्य वारसांची नावे आधीच अभिलेखात दाखल असल्यास, फक्त त्या मयत खातेदाराचेच नाव गाव नमुना सातबारावरून कमी करणे आवश्यक ठरते.
यासाठी सातबारावरील असणाऱ्या खातेदारापैकी एका खातेदाराने फक्त मयत व्यक्तीचे नाव कमी करण्याकरीता अर्ज करावा लागतो.
मयत खातेदाराचे नाव कमी करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे
१) मयत खातेदाराचा मूळ किंवा प्रमाणित मृत्यु दाखला.
२) आधी वारस नोंद झालेल्या फेरफारची नक्कल.
३) हयात वारसांच्या वयाच्या पुराव्याची साक्षांकीत प्रत.
४) सर्व हयात वारसांच्या आधार कार्डची स्वसाक्षांकीत प्रत.
५) वारसांबाबत विहित नमुन्यातील शपथपत्र/स्वंयंघोषणापत्र.
६) अर्जातील सर्व वारसांबाबत पत्ता, दुरध्वनी/भ्रमणध्वनी यांचा पुराव्यासह तपशील.
७) परदेशस्थ वारसाचा (असल्यास) ई-मेल व पत्ता याचा पुरावा.
याकरिता अर्ज करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी/तलाठी यांचेशी संपर्क साधून अर्ज करू शकता अथवा ई-हक्क प्रणालीवरून ऑनलाईनही अर्ज करता येतो.
अधिक वाचा: कृषी समृद्धी योजनेत फलोत्पादन अंतर्गत 'या' घटकांना अनुदान; कशाला मिळंतय किती अनुदान?