lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Summer Tillage उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी?

Summer Tillage उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी?

How and when to do summer tillage? | Summer Tillage उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी?

Summer Tillage उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी?

उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी मशागतीचे उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच मशागत करणे फायद्याचे ठरते.

उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी मशागतीचे उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच मशागत करणे फायद्याचे ठरते.

शेअर :

Join us
Join usNext

उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी मशागतीचे उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच मशागत करणे फायद्याचे ठरते. कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने मशागतीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, मशागत खोलवर होते, पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो व जमिनीस सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होतो.

रबी व उन्हाळी हंगामातील पिके काढल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये त्वरीत नांगरण्या कराव्यात. हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरूवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.

उन्हाळी मशागतिशिवाय इतर हंगामातील मशागतची खोली राखणेकरीता विविध सुधारीत अवजारांचे वापर
१) जमीन सपाट करणे

- पावसाचे पाणी किंवा पटाचे पाणी एकाच दिशेने जमिनीतून वाहून न जाता किंवा कुठेतरी साचून न राहता ते सर्व ठिकाणी सारखे बसण्यासाठी जमीन सपाट करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पिकांची एकसारखी वाढ होण्यास मदत होते.
- हे पुर्वमशागतीचे काम प्रत्येक जमिनीत व दरवर्षी करण्याची आवश्यकता नसते.
- लाकडी फाटा हे अवजार लाकडी ओंडक्यापासून बनविलेले असून ते बैलाच्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वापरता येते.
- ट्रॅक्टरचलित टेरेसर ब्लेड लेव्हलर, ट्रॅक्टरचलित हायड्रोलिक लेव्हलरचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो.

२) कुळवणी किंवा वखरणी
- कुळवणीमुळे जमिन भुसभुशीत होते. जमिनीत हवा खेळती राहते.
- पिकांची मुळे योग्य खोली पर्यंत वाढतात.
- तणांचा नाश होण्यास मदत होते.
- शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात शेणखत टाकल्यास ते जमिनीत चांगले मिसळते.
- जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
- याकरीता तव्यांचा कुळव, दात्यांचा कुळव, स्प्रिंग दात्यांचा कुळव, त्रिकोणी खुटींचा कुळव याचा समावेश होतो.

अधिक वाचा: Ploughing जमीन का नांगरावी? काय आहेत फायदे

Web Title: How and when to do summer tillage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.