Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Harbhara Lagwad : यांत्रिक पद्धतीने हरभरा काढणी करायचीय? पेरा हे दोन वाण

Harbhara Lagwad : यांत्रिक पद्धतीने हरभरा काढणी करायचीय? पेरा हे दोन वाण

Harbhara Lagwad : Want to harvest chick pea by harvester machines? Sow these two varieties | Harbhara Lagwad : यांत्रिक पद्धतीने हरभरा काढणी करायचीय? पेरा हे दोन वाण

Harbhara Lagwad : यांत्रिक पद्धतीने हरभरा काढणी करायचीय? पेरा हे दोन वाण

हरभऱ्याचे नव्याने प्रसारित करण्यात आलेले वाण देखील अधिक उत्पादनक्षम व रोगास प्रतिकारक आहेत तसेच काही वाणांची आपण यांत्रिक पद्धतीने काढणी करू शकतो.

हरभऱ्याचे नव्याने प्रसारित करण्यात आलेले वाण देखील अधिक उत्पादनक्षम व रोगास प्रतिकारक आहेत तसेच काही वाणांची आपण यांत्रिक पद्धतीने काढणी करू शकतो.

महाराष्ट्र राज्यात रबी हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या विविध पिकांमध्ये हरभरा हे सर्वात महत्वाचे पीक असून राज्याच्या एकूण कडधान्य उत्पादनात या पिकाचा ६३ टक्के वाटा आहे.

कृषि विद्यापीठांनी संशोधनाद्वारे या पिकाचे एकापेक्षा एक सरस वाण प्रसारित केले असून हे वाण अधिक उत्पादनक्षम व रोग प्रतिकारक आहेत. हरभऱ्याचे विजय, दिग्विजय, विशाल हे प्रचलित वाण असून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

नव्याने प्रसारित करण्यात आलेले वाण देखील अधिक उत्पादनक्षम व रोगास प्रतिकारक आहेत तसेच काही वाणांची आपण यांत्रिक पद्धतीने काढणी करू शकतो.

यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यायोग्य वाण
१) फुले विक्रम
-
हा वाण महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विकसित करण्यात आला आहे.
- सन २०१६ मध्ये महाराष्ट्रात तसेच २०१९ मध्ये देशपातळीवर गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान राज्यात लागवडीकरीता प्रसारित करण्यात आला आहे.
- हा वाण पिवळसर तांबूस रंगाचा, मध्यम आकाराचे दाणे असलेला आणि मर रोग प्रतीकारक्षम आहे.
- वाढीचा कल मध्यम उंच असून यांत्रिक पध्दतीने काढणीकरता योग्य वाण आहे.
- या वाणापासून जिरायत परिस्थितीत सरासरी १६.०० क्विं/हेक्टर, बागायतीत २२.०० किं/हेक्टर तर उशीरा पेर परिस्थितीत २१.०० क्विं/हेक्टर उत्पन्न मिळते.
- या वाणाची पक्वता १०५-११० दिवसात येते.

२) पीडीकेव्ही कनक
-
हा वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी संशोधित केला आहे.
- सन २०१९ मध्ये महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश राज्यांकरीता हा वाण प्रसारित करण्यात आला.
- यांत्रिक पध्दतीने काढणी करण्यास हा वाण उपयुक्त असून दाणे मध्यम टपोरे आहेत.
- मर रोगास हा वाण सहनशील असून संरक्षित ओलीताखाली लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.
- या वाणाची पक्वता कालावधी १०८ ते ११० दिवस असून सरासरी उत्पन्न १८-२० किं/हेक्टर आहे.

अधिक वाचा: Rabi Sowing : पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताय मग अशी करा उगवण क्षमता चाचणी

Web Title: Harbhara Lagwad : Want to harvest chick pea by harvester machines? Sow these two varieties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.