Join us
Daily Top 2Weekly Top 5

जादा पावसात तग धरणारे हे तेलबिया पीक घ्या आणि मिळवा अधिकचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 10:48 IST

कारळा हे दुर्लक्षित केलेले पण कोकणातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो.

कारळा हे दुर्लक्षित केलेले पण कोकणातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारे वंगण आणि सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो.

कारळ्याच्या पेडींचा वापर जनावरांना खाद्यपेंड म्हणून करतात. विशेषतः दुभत्या जनावरांसाठी या पेंडीचा वापर केला जातो. कारण या पेंडीमध्ये ३७ टक्के प्रथिने, २६ टक्के कर्बोदके आणि ४.५८ टक्के खनिजे असतात. तसेच या पेंडीचा वापर सेंद्रिय खत म्हणूनही केला जातो. या पेंडीमध्ये ५ टक्के नत्र, २ टक्के स्फुरद, व १.५ टक्के पालाश असते.

कारळा बी स्वादिष्ट चटण्या आणि खमंग मसाल्यामध्ये वापरण्यात येते. बहुपीक पद्धतीमध्ये मधमाशा आकर्षित करणारे व किडींना परावृत्त करणारे पीक आहे. असे हे बहुपयोगी कारळ्याचे पीक शेतकऱ्यांनी मात्र पूर्णपणे दुर्लक्षिले आहे.

या पिकाची लागवड मुख्यत्वे करून वरकस उताराच्या आणि साधारण प्रतीच्या जमिनीवर घेतली जाते. विशेषतः खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणून या पिकाचा आजवर विचार केला आहे. पीकवाढीसाठी लागणाऱ्या अन्य घटकांचा किंवा सेंद्रिय खतांचा या पिकासाठी वापर केला जात नाही.

हे पीक खूप दाट पेरल्यास खरीप हवामानात उंच वाढते, फांद्या कमी फुटतात. त्यामुळे कारळ्याचे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. कारळा हे पीक खरीप व रब्बी हंगामात घेता येते. जादा पावसात तग धरते शिवाय पाण्याचा ताणही सहन करते. प्रतिकूल परिस्थितीत पिकाची चांगली वाढ होते.

जमिनीतील सर्वसाधारण अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्येही पीक उत्तम येते. या पिकामध्ये अवकर्षण प्रतिकारक शक्ती असल्यामुळे कमीत कमी पाण्यात या पिकाची चांगली वाढ होते. या पिकास रोग, किडींचा विशेष प्रादुर्भाव होत नाही. उग्र वास असल्यास भटक्या गुरांचा त्रास पण कमी होतो.

कारळ्याची फुले पिवळी असतात. ती जास्त दिवस शेतात टिकून राहतात. आंतरपीक म्हणून चांगला प्रतिसाद मिळतो. कारळ्याचे तेल खाद्यतेल म्हणून उपयुक्त तसेच पेंडीचा पशुखाद्य, पक्षीखाद्य तसेच सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो. पक्ष्यांचा या पिकास बिलकूल त्रास होत नाही. या पिकाची फूलधारणा झाल्यावर आकर्षित होतात. त्यामुळे शेतातील इतर परपरागसिंचित पिकांमध्येपरागीभवन जास्त प्रमाणात होते.

उत्पन्न व शेत सुशोभिकरणकारळ्ळ्याची पिवळीधम्मक फुले २० ते २५ दिवस टिकून राहतात. या गुणधर्माचा योग्य वापर करून शेतजमीन सुशोभित करण्यासाठी या पिकाची लागवड उत्तम ठरते. तृणधान्ये, भाजीपाला पिकांमध्ये अशाप्रकारे लागवड करणे शक्य आहे. या पिकांच्या भोवती लागवड करावी. पिकाची फुले सुकून बोंडे काळी झाली की, कापणी करावी.

अधिक वाचा: Maha DBT शेतकऱ्यांनो एकाच अर्जातून घ्या अनेक कृषीविषयक योजनांचा लाभ

टॅग्स :शेतीशेतकरीपीकपीक व्यवस्थापनपाऊसआरोग्य