Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > शेती आधारित या खताचे उत्पादन करून घ्या हमखास उत्पन्न

शेती आधारित या खताचे उत्पादन करून घ्या हमखास उत्पन्न

Get guaranteed income by producing this farm-based fertilizer | शेती आधारित या खताचे उत्पादन करून घ्या हमखास उत्पन्न

शेती आधारित या खताचे उत्पादन करून घ्या हमखास उत्पन्न

Gandul Khat टाकाऊ सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळाचा उपयोग केला असता गांडुळे सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून चर्वण व पचन करून कणीदार कांतीच्या स्वरुपात शरीराबाहेर टाकतात.

Gandul Khat टाकाऊ सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळाचा उपयोग केला असता गांडुळे सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून चर्वण व पचन करून कणीदार कांतीच्या स्वरुपात शरीराबाहेर टाकतात.

टाकाऊ सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळाचा उपयोग केला असता गांडुळे सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून चर्वण व पचन करून कणीदार कांतीच्या स्वरुपात शरीराबाहेर टाकतात.

या खतात गांडुळाची लहान पिल्ले व अंडकोष असतात. सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत उपयुक्त आहे, त्यामुळे मागणी अधिक आहे. गांडूळ खत निर्मितीतून उत्पन्न वाढीचा चांगला मार्ग आहे.

तृणधान्य व कडधान्य पिकासाठी हेक्टरी पाच टन गांडूळ खत Vermicompost देण्यात येते. फळझाडांच्या वयोमानानुसार शेणखताच्या मात्रेच्या निम्मी मात्रा गांडूळ खताची द्यावी. गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. जलधारणा शक्ती वाढते. जमिनीची धूप कमी होते.

कसे कराल गांडूळ खत
-
गांडुळांची मोठ्या प्रमाणावर पैदास करण्यासाठी एक मीटर लांब, एक मीटर रुंद, व ३० सेंटीमीटर उंचीची लाकडी खोकी अथवा सिमेंटच्या टाक्या अथवा प्लास्टिकच्या टबचा वापर करावा.
- खोक्याच्या तळाशी तीन सेंटीमीटर जाडीचा सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचा (लाकडी भुसा, तूस, काथ्या अथवा पाचट) थर रचावा.
- त्यावर तीन सेंटीमीटर जाडीचा कुजलेल्या शेणखताचा अथवा शेणखत तसेच मातीचा थर द्यावा.
- प्रत्येक थरावर पाणी शिंपडून भिजवून घ्यावे.
- या थरावर १,००० पूर्ण वाढ झालेली गांडुळे सोडावीत.
- त्यावर गांडुळाच्या खाद्याचा १५ सेंटीमीटर जाडीचा थर पसरावा.
- या खाद्यामध्ये १० भाग कुजलेले शेण, एक भाग भात किंवा गव्हाचा कोंडा, एक भाग हरभऱ्याच्या सालीचा कोंडा आणि १ भाग भाजीपाल्यांचे अवशेष अथवा कुजलेला पालापाचोळा यांचे मिश्रण असावे.
- या थरावर पाणी शिंपडून ओले बारदाना अंथरावे.
- सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी खोकी सावलीत ठेवावीत.
- उंदीर, घूस, मुंग्या, बेडकांपासून गांडुळाचे संरक्षण करावे.
- आठ ते दहा दिवसांनंतर खाद्याच्या पृष्ठभागावर लहान ढिगाच्या स्वरूपात गांडुळाची कणीदार कात दिसून येईल.
- ही कात वेगळी करून खत म्हणून वापर करावा.
- खाद्य जसजसे कमी होत जाईल, तसतसे वरच्या थरावर खाद्य घालत रहावे.
- साधारणतः आयसेनिया फेटिडा आणि युड्रीलस युजिनी या जातीच्या एका जोडीपासून तीन महिन्यानंतर ६० गांडुळांची निर्मिती होते.

गांडूळपाणी (वर्मीवॉश)
गांडुळाचे शरीर लांब व दंडगोलाकृती असून आतील बराचसा भाग पोकळ असतो. या पोकळ भागात आतड्यांचा भाग असून त्याच्या सभोवती पेशींचा थर असतो. हा पोकळ जाड द्रव्याने भरलेला असतो. गांडुळांच्या शरीरातून पाणी जाऊ दिले तर हा द्रव गोळा करता येतो. यालाच 'वर्मी वॉश गांडूळपाणी' म्हणतात. गांडूळपाण्यात पिकांच्या वाढीस उत्तेजक पदार्थांचा समावेश आहे. हे पिकांच्या पानावर फवारतात.

Web Title: Get guaranteed income by producing this farm-based fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.