महाराष्ट्रातील गव्हाचे कमी उत्पादन येण्याची कारणांमध्ये पाणीपुरवठापीक अवस्थेनुसार न करणे हे मेक महत्वाचे कारण आहे गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे.
गव्हाची पेरणी करताना शेत ओलवून वापसा आल्यावर करावी. पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते. पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत. त्यावेळी पाणी देणे फायदेशीर ठरते.
गहू पिकाला पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था१) मुकुटमुळे फुटण्याची अवस्था पेरणीनंतर १८ ते २१ दिवस२) काडी धरण्याची अवस्था पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस३) फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था पेरणीनंतर ६० ते ६५ दिवस.४) दाणे भरण्याची अवस्था पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस
पाणी पुरवठा अपुरा असल्यास कधी द्याला पाणी१) गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ५२ दिवसांनी द्यावे.२) गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
काही ठराविक वेळेलाच पाणी देणे शक्य असेल तर पाण्याच्या पाळ्या वरीलप्रमाणे द्याव्यात. अपुरा पाणी पुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी देणे शक्य आहे त्या क्षेत्रात पंचवटी (एन.आय.डी.डब्ल्यु. १५) किंवा नेत्रावती (एन.आय.ए.डब्ल्यु. १४१५) गव्हाच्या वाणांचा वापर करावा.
गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते व दोन पाणी दिले तर उत्पादनात २० टक्के घट येते.
अधिक वाचा: Gahu Lagwad : गहू पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी लागवड व्यवस्थापनात असे करा बदल